राष्ट्रवादीच्या आमदाराला राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक

आमदार राजू कारेमोरेंनी (Raju Karemore) मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला होता.
Raju Karemore

Raju Karemore

Sarkarnama

Published on
Updated on

भंडारा : भंडारा जिल्हाच्या (Bhandara) तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)आमदार राजू कारेमोरेंना (Raju Karemore) आज (ता.3 जानेवारी) पोलिसांनी (Bhandara Police) त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे व पोलीस कर्मचाऱ्यांवर ५० लाख चोरीचा आरोप लावीत, मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळी धिंगाणा घातला होता. त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

<div class="paragraphs"><p>Raju Karemore</p></div>
काय निर्बंध घालायचे ते घाला, पण लाॅकडाऊन सहन करणार नाही

कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे (31 डिसेंबर) रात्री 9 च्या वाजताच्या सुमारास घरून 50 लक्ष रुपयांची रोकड वाहनातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडीकेटर का दाखवला नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच करेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्र जवळील ५० लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविले असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला.

याप्रकरणी फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर, बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उप निरीक्षक राणे यांनी देखील फिर्यादी यांनी शासकीय कामात अडथळा करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला होता. त्यानंतर आज (ता.3 जानेवारी) पोलिसांनी कारवाई करत कारेमोरेंना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Raju Karemore</p></div>
पोलिसांना शिवीगाळ केल्यानंतर आमदार कारेमोरे पडले एकाकी…

दरम्यान, आमदार कारेमोरेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर त्यांनी वरिष्ठांची माफीसुद्धा मागितली. तरीही नेते त्यांच्यावर नाराज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या कृत्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही पाठबळ त्यांनी न मिळाल्याने मोहाडी पोलिस स्टेशन समोर नियोजित रास्ता रोको कार्यक्रम स्थगित करण्याची नामुश्‍की सुद्धा त्यांच्यावर आली होती. आता त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आल्याने पुढे या प्रकरणात काय होते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com