उच्छाद मांडला आहे; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती : प्रविण दरेकर

Pravin Darekar | Navneet Rana | Ravi Rana : मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला आणि नवनीत राणा - रवि राणा प्रकरणावरुन भाजप आक्रमक
Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. अराजकतेची परिस्थिती आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे कार्यकर्ते कायदा हातात घेत आहेत. मागील आठवड्याभरापासून उच्छाद मांडला आहे. कायदा पक्षपातीपणे वागत आहे, असा आरोप करत राज्याचे विरोधी विधान परिषदेचे पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थीती असल्याचे मत व्यक्त केले. ते आज भाजपाच्या (BJP) मुंबईतील आमदार आणि खासदारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, "राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. सरकार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच कायदा हाती घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने उच्छाद मांडला आहे. याची सुरुवात भाजपाच्या पोलखोल यात्रेवर हल्ला करण्यापासून झाली. काल मोहित कंबोज रस्त्यावरून जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

नवनीत राणांच्या बाबतीतही केवळ हनुमान चालिसा पठण हा विषय होता. मात्र शिवसेनेने शिवसैनिकांना राणांच्या घरापर्यंत जाऊ दिले, त्यांना अडवलं नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री, त्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या डोळ्यादेखत गुंडगिरी करत आहेत आणि यावर शिवसेनेचे नेते याचे समर्थन करत असून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. अशावेळी समोरचे कार्यकर्ते काय हातावर हात ठेवून बसणार नाहीत, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी दिला.

विरोधी पक्ष नेते दरेकर पुढे म्हणाले, जर तुम्ही आक्रमक होणार असाल तर आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही. जसे मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माशी डसते. तसे आम्हीही उत्तर देवू. भाजपाचा संघर्षाचा इतिहास आहे. नेत्यांनी टोकाचा संघर्ष केला आहे. आमच्या शेपटावर पाय ठेवून डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजपा शांत बसणार नाही. भाजपाही टिट फॉर टॅट करू शकते, असा इशारा देत आम्ही कायद्याला मानणारे, लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे कायद्याच्या मार्गाने जे करता येईल ते करू. आम्ही पोलिसात जाऊन आय़ुक्तांना निवेदन देऊ, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बोलून दाखवला आहे. राणा यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या शिवसेना अधिक आक्रमक झाली असून संतप्त शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com