Ashadi Ekadashi 2023: तयारी वारीची: वारी मार्गांवर टोल भरावा लागणार? चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर!

देहू आळंदीकडून पंढरपूरकडे ज्या दोन पालख्या दरवर्षी रवाना होतात. या पालख्यांच्या मार्गांत अनेक मुक्काम असतात.
Chandrakant Patil Comments on Ashadhi Wari
Chandrakant Patil Comments on Ashadhi Wari Sarkarnama

Ashadi Ekadashi 2023: आषाढी वारीनिमित्त आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांचे प्रमुख आणि जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वारी मार्गातील सोयीसुविधा पुरवण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. (Preparation Wari: Will toll be paid on Wari routes? Answer given by Chandrakant Patil)

Chandrakant Patil Comments on Ashadhi Wari
New Parliament Inauguration : संसदेच्या नव्या इमारतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे यासाठी याचिका

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ''नवीन रस्त्यावर वारीच्या आधी टोल सुरु करु नये अशी वारकऱ्यांनी मागणी केली आहे. पण वारीच्या आधी जरी टोल सुरु झाला तरी, वारकऱ्यांना टोल लागणार नाही, याबाबत आम्ही केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी इथे आहेत. वारीच्या काळात वारकऱ्यांना एक फ्री पास द्यावा, अशी मागणी आम्ही मंत्री गडकरी यांच्याकडे करणार आहोत.

देहू आळंदीकडून पंढरपूरकडे ज्या दोन पालख्या दरवर्षी रवाना होतात. या पालख्यांच्या मार्गांत अनेक मुक्काम असतात. या मुक्कामांच्या ठिकाणी पुरेशा सोयीसुविधा असाव्यात. या सोयीसुविधा पुरवण्यासाठी काही गोष्टींची पुर्वतयारी करावी लागते, ती गेली महिनाभर प्रशासन पातळीवर सुरु होती. पण आज वारकरी प्रमुख आणि प्रशासनांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ज्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा वारीशी संबंध येतो.त्या तीन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कलेक्टर आणि वारकऱ्यांचे नेते यांच्यासोबत ही बैठक घ्यावी लागते, ती बैठक आज (२५ मे) पार पडली. (Ashadi Ekadashi 2023)

Chandrakant Patil Comments on Ashadhi Wari
Best Bakery case : बेस्ट बेकरी प्रकरणाची सुनावणी तहकूब..; कारण काय?

गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने जी तयारी केली आहे.त्यात स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. भविष्यातील काही मोठे विषय आले आहेत. यासाठी दोन समित्या तयार केल्या आहेत. त्यातली पहिली विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, लगेज'ची वारी निभवण्यासाठी चार-पाच वारकऱ्यांचे प्रमुख, प्रशासनाचे चार पाच प्रमुख असतील. त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, दर आठवड्याला त्यांची प्रत्यक्ष बैठका होतील, वारी संपल्यानंतरही त्यांच्या प्रत्यक्ष बैठका होतील. (Maharashtra Politics)

या बैठकांमध्ये वारी मार्गातील दोन मुक्कामांमध्येही काही स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची, थकलेल्या वारकऱ्यांसाठी आराम करण्यासाठी मंडप उभारावेत, यासाठी यावेळी काही करता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच, भविष्यातही अशी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com