PM Narendra Modi in Mumbai News : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर आज (शनिवार) पहिल्यादांच महाराष्ट्रात आले. निमित्त होतं मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनाचं. याप्रसंगी भाषणात मोदींनी महाराष्ट्र आणि मुंबईविषयी त्यांचं काय उद्दिष्ट आहे, हे जाहीर केलं.
पंतप्रधान मोदी(PM Modi) म्हणाले, आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३० हजार कोटींच्या प्रकल्पांच्या पायाभरणी आणि लोकार्पणाची संधी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील क्षेत्रांतील दळणदळण सुलभ होणार आहे. राज्यातील युवकांना रोजगार मिळणार आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वाढवण पोर्टलाही मंजूरी दिली आहे. ७६ हजार कोटीच्या प्रकल्पातून १० लाखांहून अधिक रोजगार मिळतील.'
तसेच 'गेल्या महिन्यांपासून मुंबई देश-विदेशातील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. एनडीए सरकारही स्थिरता देऊ शकते. तिसऱ्या वेळेस शपथ घेतल्यानंतर, मी म्हणालो होतो की तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करणार आणि आज हे होता आपण पाहत आहोत.' असंही मोदींनी सांगितलं.
याशिवाय 'महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्रकाडे सशक्त वर्तमान आहे आणि महाराष्ट्रकाडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र ते राज्य आहे ज्याच विकसित भारताच्या निर्मितीत खूप मोठी भूमिका आहे. महाराष्ट्राकडे उद्योगांची ताकद आहे, शेतीची ताकद आहे, आर्थिक विभागाची ताकद आहे. याच पॉवरने मुंबईला देशाचे फायनान्स हब बनवलं आहे. आता माझं उद्दिष्ट आहे, महाराष्ट्राच्या याच ताकदीने महाराष्ट्राला जगातील मोठं आर्थिक पॉवर हब बनवण्याचं. माझं उद्दिष्ट आहे मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवण्याचं.' असं पंतप्रधान मोदींनी याप्रसंगी बोलून दाखवलं.
याचबरोबर 'माझी इच्छा आहे महाराष्ट्र पर्यटनात भारतात क्रमांक एकचे राज्य बनावे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असे भव्य किल्ले आहे, येथे कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे मनमोहक दृश्य आहे. येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगावरील सफरीचा रोमांच आहे. येथे कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची अपार शक्यता आहे. भारतात महाराष्ट्र विकासाची नवी गाथा लिहिणार आहे आणि आपण सर्वजण याचे सहयात्री आहोत.' असं मत मोदींनी यावेळी माडंलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.