Devendra Fadnavis News : 'या' अभूतपूर्व प्रकल्पांसाठी पीएम मोदींचं नाव इतिहासात लिहिलं जाईल; फडणवीसांचं मोठं विधान

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील जवळपास 29 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे कीर्तिमान करणारे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्याने आनंद होत आहे. त्यांच्या हस्ते 29 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. पीएम मोदींचा हा कार्यकाळ गरिब कल्याणाच्या कामासाठी लक्षात ठेवला जाईल. त्यासोबतच अभूतपूर्व प्रकल्पांसाठी त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल, असे मोठं विधान यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील जवळपास 29 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम मोदींच्या (Narendra Modi) कामांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसह केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीगण उपस्थित होते.

अटल सेतू, कोस्टल, मेट्रो, एअरपोर्ट असेल किंवा ठाणे-बोरिवली, ट्विन टनल प्रकल्प हे प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाचे मार्व्हल आहेत. मुंबईकरांचा प्रचंड वेळ वाचवणारे हे प्रकल्प आहेत. आपल्याच हस्ते 2018 साली एक संकल्प लॉंच केला होता. 59 मिनिटांच्या आत मुंबईत कुठल्याही भागातून कुठल्याही भागात पोहोचता आले पाहिजे, त्यातील हे दोन प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. त्यांनी गेल्या 10 वर्षांत विकास पर्वाने देश घडवला आहे. पंतप्रधान झाल्यावर त्यांचा हा पहिलाच मुंबईचा दौरा आहे. 29 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. तरुण व तरुणींना दिशा दाखवण्याचे काम योजनेतून केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Sakal Election 2024 Survey News: विधानसभा निवडणुकीत मतदारांची 'या' पक्षाला सर्वाधिक पसंती ? मोठ्या सर्व्हेतून आले समोर

10 लाख विद्यार्थ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. गेल्या 10 वर्षात देशाचा विकास होतोय, तसाच विकास आगामी काळात होईल, याची खात्री आहे. केवळ विकास पुरुष नव्हे तर गरिबांच्या विकासाचे ध्यास घेतलेले प्रधान सेवक ते आहेत.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड, ठाणे बोरीवली टनल हे मोदींच्या कार्यकाळात होतेय याचा आनंद होत आहे. अटल सेतु व कोस्टल रोड हे त्यांच्या कार्यकाळात कार्यरत झाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis On MLC Election : विधान परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेचाही निकाल सांगितला; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com