Sharad Pawar On PM Modi: मोदींची टीका चुकीची; सर्वात आधी आरक्षण...; शरद पवारांनी थेट इतिहासच सांगितला

Political : महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती.
Sharad Pawar and PM Modi:
Sharad Pawar and PM Modi: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: "महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय विरोधी पक्षांकडे पर्याय नव्हता. विरोधकांनी या विधेयकाला नाईलाजाने पाठिंबा दिला", अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सोमवारी केली होती. मोदींच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले तर कोणीही विरोध केला नाही. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, ही मोदींची टीका चुकीची आहे. महिला आरक्षणावर आधीदेखील विचार झालेला आहे", असा हल्लाबोल पवारांनी पंतप्रधान मोदींवर केला.

Sharad Pawar and PM Modi:
Sudhir Mungantiwar News : मुनगंटीवारांनाही झाला सोहमची भेट घेण्याचा मोह, कोण आहे हा मुलगा?

"1993 मध्ये महाराष्ट्राची सूत्रं माझ्याकडे होती. त्यावेळी राज्य महिला आयोग आम्ही स्थापन केला. महाराष्ट्र हे महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. याचवेळी स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला. पण मोदी म्हणतात की, देशात महिला आरक्षणाचा विचार कोणी केला नाही. मात्र, आम्ही आरक्षण दिले हे मोदींचे विधान चुकीचे आहे. सर्वात आधी महिलांना मानाचं स्थान देण्याचं काम महाराष्ट्राने केले, असं म्हणत शरद पवार यांनी थेट इतिहासच सांगितला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"महिलांना आरक्षण देण्याचे कामदेखील आम्ही केले. देशात पहिले महिला धोरण जाहीर झाले, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण दिले, हे आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. मी संरक्षण विभागात असताना तिन्ही दलात महिलांसाठी 11 टक्के जागा राखीव ठेवल्या", असं पवार म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and PM Modi:
BJP ON Gholap: मुलीनंतर भाजपने फेकले माजी मंत्री घोलप यांच्यावर जाळे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com