Uddhav Thackeray News : 'पंतप्रधान मोदींचा बांग्लादेशच्या लढाईत सहभाग, पण बाबरीच्या वेळी हिमालयात..'; ठाकरेंचा सणसणीत टोला

Udhhav Thackeray On Narendra Modi : बाबरी पाडल्यानंतर हे इतके वर्ष गप्प् का होते?
Uddhav Thackeray News : ' Udhhav Thackeray On Narendra Modi
Uddhav Thackeray News : ' Udhhav Thackeray On Narendra ModiSarkarnama

Udhhav Thackeray On Narendra Modi : राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakanat Patil) यांनी बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला होता, यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, प्रत्युत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray News : ' Udhhav Thackeray On Narendra Modi
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "ज्यावेळेला बाबरी पाडली, तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता, आताचे पंतप्रधान त्यावेळेला बांग्लादेशच्या सत्याग्रहात सहभागी होते पण, बाबरी पाडण्याच्या आंदोलनावेळी कदाचित ते हिमालयात निघून गेले असतील पण मला माहिती नाही. पण त्यांचंही नाव कुठे ही आलेलं नव्हतं," अशा शब्दात ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

बाबरी पाडल्यानंतर हे इतके वर्ष गप्प् का होते? भाजपची किव येते. भागवत आता मशिदीत जात आहेत. दुसरीकडे बाबरी आम्हीच पाडली ते म्हणतात, या भाजपवाल्यांचं नक्की यांचं हिंदूत्त्व कोणते आहे? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray News : ' Udhhav Thackeray On Narendra Modi
Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, बाबरी पाडण्यात अनेक शिवसैनिक नव्हते, तर आडवाणींचा व्हिडीओ पहा, न्यायालयाने राममंदिराचा निकाल दिला आता भाजप त्याचं श्रेय घेत आहे. राममंदिरासाठी विशेष कायदा करण्याची मागणी केली होती. अशा भरकटलेल्या लोकांच्या हातात देश कसा द्यायचा, हे लोकांनी पाहावं, असे ही ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com