Pune Bazar Samiti : हवेली बाजार समिती निवडणुकीत अजितदादांना महेशदादांचा धक्का !

Pune Bazar Samiti : अजित पवार यांना मोठा धक्का आहे.
Pune Bazar Samiti :
Pune Bazar Samiti :Sarkarnama

पिंपरी : पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांना हाताशी धरून भाजपने सत्ता मिळवली. हा राष्ट्रवादी आणि त्यातही त्यांचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का आहे. तो देण्यात मोठा वाटा पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे (Mahesh Landge) यांचा आहे.

Pune Bazar Samiti :
Parli APMC Result News : धनंजय मुंडेची खेळी, शेठ पडले अन् मुनिम निवडून आले..

`हवेली`तील भाजपच्या विजयाचे भोसरी कनेक्शन समोर आले आहे. हवेलीचा उपबाजार पिंपरी-चिंचवडमधील मोशीत आहे. मोशी हे भोसरी मतदारसंघात मोडते.तर,भोसरीचे आमदार पैलवान लांडगे आहेत.ज्या मुख्य बंडखोरामुळे हवेलीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले ते विकास दांगट हे आ. लांडगेंचे नातेवाईक (मेव्हणे) आहेत.त्यांनाच नाही, तर सोसायटी मतदारसंघातील सर्व ११ उमेदवारांना पर्यायाने पॅनेलला निवडून आणण्यात आ. लांडगेंच मोठा वाटा आहे.त्यांच्या पॅनेलमधून निवडून आलेले रोहीदास उंदरे हे त्यांचे दाजी आहेत.

Pune Bazar Samiti :
Manchar Bazar Samiti Result : मंचर बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात !

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या अशा हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत पूर्व हवेलीची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांनी आ.लांडगेंवर सोपवली होती.सोसायटीच्या १६२६ मतदारांपैकी ६२६ मतदार हे पूर्व हवेलीतील आहेत. त्यापैकी तब्बल ६१३ मते भाजप पुरस्कृत पॅनेलला मिळाली आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या दणदणीत पराजय झाला.आ.लांडगेंच्या भोसरी मतदारसंघातील हवेलीचे बहूतांश सोसायटी मतदार त्यांनी आपल्या पॅनेलकडे खेचले. १३ सोसायट्यांतील १२७ मतदारांपैकी ११५ जणांची मते त्यांनी आपल्याकडे वळवली.त्यात भोसरी मतदारसंघातील मोशी, चिखली मोशी, चिखली, तळवडे, डूडूळगाव, चऱ्होलीतील सोसायटी मतदार आहेत.

Pune Bazar Samiti :
Bazar Samiti Result : बीड जिल्ह्यात बाजार समित्यांवर आघाडीची बाजी; आडसकरांनी केज राखलं

राष्ट्रवादीच्या बंडखोरांसह हवेलीत भाजपचे पॅनेल बनविण्यात आ. लांडगेंचा सहभाग होता. फडणवीसांनीच तसा आदेश दिला होता.एवढेच नाही,तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॉरिशस येथील पुतळ्याच्या उदघाटनासाठी तिकडे गेलेले फडणवीस यांनी काल आ. लांडगेंना फोन करून हवेली बाजार समिती निवडणुकीची माहिती घेतली होती.

या समितीव्दारे अजितदादांना पराभवाचे तोंड पहायला लावणारा आ.महेशदादांचा हा दुसरा धक्का आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) निवडणुकीत प्रदीप कंद यांना निवडून आणत त्यांनी पहिला धक्का अगोदरच दिला होता. तर, या दुसऱ्या धक्यातून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात दमदार एंट्री झाली आहे. ती त्यांना भविष्यात व बहूधा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उपयोगी पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com