Bazar Samiti Result : बीड जिल्ह्यात बाजार समित्यांवर आघाडीची बाजी; आडसकरांनी केज राखलं

Beed District APMC : कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली
MVA
MVASarkarnama

MVA vs BJP : बीड जिल्ह्यातील (Beed) सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. याचा निकाल शनिवारी (ता. २९) जाहिर झाला. त्यावेळी बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून आले. तर केवळ केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता राखण्यात भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांनी आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांच्या साथीने यश मिळविले आहे.

MVA
Bazar Samiti Result : अमरसिंहांच्या विरोधात भाजप आमदार पवार- शिवसेनेचे बदामराव एकत्र, पण डिपॉझिट झाले जप्त!

जिल्ह्यात शुक्रवारी वडवणी, केज, परळी, अंबाजोगाई, गेवराई व बीड या सहा बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान झाले. यामध्ये वडवणी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणीही शुक्रवारीच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanki) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १८ जागा जिंकल्या. तर, शनिवारी बीड, केज, परळी, अंबाजोगाई व गेवराईचा निकाल लागला.

MVA
Kannad APMC Result News : आजी-माजी आमदारांच्या पॅनलचा धुव्वा ; जाधव-पाटलांच्या शिवशाहीला १६ जागा..

या निवडणुकीत बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Khirsagar) यांच्यासह भाजप, शिवसेना, शिवसंग्राम, शिवसेना (उबाठा) यांनी एकत्र येत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Khirsagar) यांच्या नेतृत्वाखालील ४० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. माजी मंत्री क्षीरसागरांना भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही मदत केली.

परळीत धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नेतृत्वाखाली आघाडीचा पराभव केला.

गेवराईत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांना भाजप आमदार लक्ष्मण पवार व शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आव्हान दिले होते. ते आव्हान पंडित यांनी मोडीत काढून विजय मिळविला आहे. अंबाजोगाईतही महाविकास आघाडीनेच विजय मिळविला.

MVA
Vijay Wadettewar : वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांसोबत युती केली नाही, तर निष्क्रीयतेमुळे चंद्रपुरात आले अपयश !

केज बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे प्रमुख भाजप नेते रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar) व आमदार नमिता मुंदडा यांच्या गटाने एकत्र येत सत्ता राखण्यात यश मिळविले. जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यातील कडा बाजार समिती यापूर्वीच भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध आली आहे. तर, माजलगाव व पाटोदा बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. २९) मतदान होऊन याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com