BJP : पुण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

BJP : पुण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

BJP : शैलेश बढाई हे ट्रस्टमधील व्यवहार पाहतात. समाजाच्या कार्यक्रमाचा खर्च ते व्हॅाटस्अँप ग्रुपवर टाकत असतात.
Published on

BJP : समाजाच्या ट्रस्टच्या कार्यक्रमाचा खर्च समाजाच्या व्हॅाटस्अॅप ग्रुपवर टाकल्याच्या कारणावरुन भाजपच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शैलेश नारायण बढाई (वय २८, रा, बढाई गल्ली, रविवारी पेठ) असे त्यांचे नाव आहे. शैलेश बढाई हे भाजपच्या कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष आणि पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ही घटना रविवार पेठेतील बढाई गल्लीत सोमवारी रात्री घडली.

याबाबत शैलेश बढाई यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. कमलेश बालाजी बढाई (वय ३५, रा. धायरी) आणि दिनेश बालाजी बढाई (वय ३८, रा. निवृत्तीनगर, वडगाव पठार) अशी संशयितांची नावे आहेत.

आरोपींनी शैलेश यांना पोटावर, छातीत मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामागे नेमके कारण आणि कोण सूत्रधार आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी बढाई यांनी केली आहे. बढाई हे ट्रस्टमधील व्यवहार पाहतात. समाजाच्या कार्यक्रमाचा खर्च ते व्हॅाटस्अँप ग्रुपवर टाकत असतात.

BJP : पुण्यात भाजपा पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Abdul Sattar यांच्या अडचणीत वाढ ; अधिकार नसताना आदेश, चौकशी होणार

रविवारी ते घराजवळ असताना कमलेश व दिनेश यांनी त्यांना याबाबत जाब विचारला. त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. दिनेश याने त्यांनी जीवे मागण्याची धमकी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com