Abdul Sattar यांच्या अडचणीत वाढ ; अधिकार नसताना आदेश, चौकशी होणार

Abdul Sattar : कोणतेही अधिकार नसताना मंत्री अशा अर्जांवर आदेश देतात, जिन्सी येथील जमीनीबाबत देखील चुकीचे आदेश दिले असल्याचे अॅड. जरारे यांनी निदर्शनास आणून दिले.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढ होत आहे. औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेबाबत औरंगाबाद खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले आहे. याबाबत बुधवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Abdul Sattar latest news)

शहरातील जिन्सी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मालकीच्या सर्वे नं. ९२३३ येथील जागेच्या व्यवहाराबाबत डॉ. दिलावर मिर्जा बेग यांनी तत्कालीन महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे एक तक्रार अर्ज केला होता. त्यावर मंत्रालयातील संबंधित कक्ष अधिकाऱ्याने चौकशीचे आणि प्रशासक मंडळ व संबंधीत अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चौकशीसाठी एक समितीदेखील गठीत करण्यात आली होती.

या आदेशाविरूध्द तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे व इतरांनी अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्यावतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. संबंधीत तक्रारदार डॉ. दिलावर मिर्जा बेग हे जाणीवपूर्वक मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत मंत्री अब्दुल सत्त्तार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात व कोणतेही अधिकार नसताना मंत्री अशा अर्जांवर आदेश देतात, अशाच प्रकारे जिन्सी येथील जमीनीबाबत देखील चुकीचे आदेश दिले असल्याचे अॅड. जरारे यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले होते.

डॉ. दिलावर मिर्जा बेग यांनी गेल्या तीन वर्षात जमीनीच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी व तत्कालीन महसुल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडे किती अर्ज केले, यासंबंधी विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Abdul Sattar
Aurangabad News : ठाकरे सरकारच्या कामाबाबत न्यायालयानं शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं

बुधवारी आयुक्तांनी संबंधित विषय आपल्या कार्यकक्षेबाहेरील असल्याचे स्पष्ट केल्यानंतर खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी महसूल विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले. सिलबंद लिफाफ्यात सचिवांनी २४ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com