G20 News : 'जी-20' म्हणजे काय ? ; काय आहे या G20 चा उद्देश ; जाणून घ्या सविस्तर !

G20 News : 'जी-20' काय आहे, हे जाणून घेऊया ! (G20 News update)
G20 News
G20 News sarkarnama

G20 News : वार्षिक G20 (Development Working Group) शिखर परिषद पुण्यात होणार आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 'जी-20' (डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप) परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी मिळाली आहे. 37 देशातील 150 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहेत. 'जी-20' काय आहे, हे जाणून घेऊया ! (G20 News update)

'जी-20'म्हणजे काय ?

'जी-२०' म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. 1999 मध्ये या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली आहे. जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट म्हणजे 'जी-२०' होय. या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे.

जी-२० सदस्यांमध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत.

G20 News
NCP Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांचे खंदे समर्थकही ED च्या रडारवर

'जी-२०'मध्ये हे आहेत सहभागी देश

भारत,अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका . संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.

G20 News
Hasan Mushrif ED Raid : छापेमारीनंतर हसन मुश्रीफांचा एकच सवाल ; म्हणाले,'पुन्हा कशासाठी.."

पहिली परिषद बर्लिनमध्ये

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे G20 परिषद डिसेंबर 1999 मध्ये आयोजित केली होती.जी २०ची राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2008 मध्ये अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली होती.

'जी २०'चा उद्देश

जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते, जगाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं. जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे. या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्त्वाचं ठरतं.जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप म्हणून G20 कडे पाहिलं जातं. विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com