Officers Transfer : पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार तर पिंपरी-चिंचवडला विनयकुमार चौबे!

Officers Transfer : अमिताभ गुप्ता यांची मुंबईला बदली.
Officers Transfer
Officers Transfer Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रा पोलिस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सदानंद दाते (Sadanand Date) यांचे दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विश्वास नांगरे पाटील यांच्यासह निकेत कौशिक (Niket Koushik) यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली.

Officers Transfer
Gram Panchayat : गोंदियात प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, भाजपचे गोपाल अग्रवालांची प्रतिष्ठा पणाला

यासोबतच मिलिंद भारंबे यांना नवी मुंबई पोलिस आयक्तपदी नियुक्ती देण्यात आली. तर दुसरीकडे विनयकुमार चौबे यांची पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी नियुक्ती कतरण्यात आली. अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी नियुक्ती करण्यात आली. नवीनचंद्र रेड्डी यांची विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त पदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान काही अधिका्ऱ्यांच्या बदल्या जूनपासून ऱखडल्या होत्या. यातील अनेक अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर या बदल्या केल्या जातील असे वाटत असतानाच, आज तातडीने या बदल्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे आता फेरबदल होऊन, अधिकाऱ्यांना पोस्टींग दिली आहे.

Officers Transfer
Officers TransferSarkarnama
Officers Transfer
Officers TransferSarkarnama
Officers Transfer
Sushma Andhare : खर्गे मोदींना रावण म्हणाले, आता अंधारेंनी 'आलमपनाह' म्हणत डिवचलं!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com