Rahul Gandhi News: राहुल गांधींची तुलना थेट दाऊद इब्राहीम, ओसामा बीन लादेनशी; नितेश राणे संतप्त, म्हणाले...

Rahul Gandhi London Speech: राहुल गांधीचा देशभरात भाजपच्या वतीने निषेध
Rahul Gandhi, Nitesh Rane
Rahul Gandhi, Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane: लंडनमध्ये राहुल गांधी यांनी भारतातील सरकारबद्दल काही मते व्यक्त केली. त्यामुळे देशातील भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही गांधीवर टीकेजी झोड उठविली आहे. कोकणातील भाजप नेते नितीश राणे यांनी तर राहुल गांधीची थेट तुलना दाऊद इब्राहीम, ओसाम बीन लादेन आणि पाकिस्तानशी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) लंडनच्या हाऊस ऑफ पार्लियामेंटमध्ये, थिंक टँक चॅटम हाऊस, केंब्रीज विद्यापीठात भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर टीका केली. गांधी म्हणाले होते की, भाजप सरकारमुळे भारतीय लोकशाही संकटात आली आहे. केंद्र सरकार विरोधक पक्षांतील काही नेत्यांवर लक्ष ठेवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुस्लीम ब्रदरहूडप्रमाणे तयार झाला आहे.

संघ फॅसिस्ट आणि कट्टरवादी संघटना आहे. त्यांनी भारतातील सर्वच संस्थावर ताबा घेतला आहे. त्यातून भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. सध्या भारातातील प्रेस, न्यायालये, निवडणूक आयोग आदी संस्था धोक्यात आहेत. तसेच मी परदेशात बोलू शकतो ते देशात बोलू शकत नाही, असा आरोपही गांधींनी केला आहे.

Rahul Gandhi, Nitesh Rane
Xi Jinping : शी जिनपिंग होणार सलग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष ; भारतावर काय परिणाम?

राहुल गांधींच्या परदेशातील या भाषणावरून देशभरातून सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परदेशात जाऊन भारताची बदनामी करता, असा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडूनही राहुल गांधीच्या परदेशातील भारताबद्दल्याच्या वक्तव्यांवर टीका केली जात आहे. गांधींनी भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचे काम केल्याचा आरोप होत आहे. राहुल गांधीच्या परदेशातील भाषणांवरून नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले आहेत. त्यांनी राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालविण्याची मागणी केली.

Rahul Gandhi, Nitesh Rane
Manish Sisodia News : जेलमधून मनीष सिसोदिया यांचा केंद्राला इशारा : ‘साहेब मला तुरुंगात टाकून....’

नितेश राणे म्हणाले, "आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करायची तेथे जाऊन टाळ्या मिळवायच्या, हा देशद्रोहच आहे. पाकिस्तान जे करते तेच राहुल गांधी करतात. पाकिस्तानची भारताबद्दल जी भाषा आहे तीच भाषा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) वापरली. आजही राहुल गांधी ज्या घरात राहतात, ज्या सुविधांचा वापर करतात त्या भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बाहेर जाऊन बदनामी करता. मग राहुल गांधी आणि दाऊद इब्राहिम, ओसाबा बीन लादेन व पाकिस्तान यांच्यात काहीच फरक नाही. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू खटला चालविला पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com