NCP MLA Disqualification Result Live : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच; दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र

NCP Crisis News in Marathi : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटांकडून आमदार अपात्रेबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. (NCP MLA Disqualification News in Marathi)
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama

NCP MLA Disqualification : शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच नार्वेकरांनी राष्ट्रवादीचाही निकाल दिला आहेे. यामध्ये विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकष ग्राह्य धरण्यात आला आहे. तर दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले.

NCP MLA Disqualification : अजित पवार गटाच्या याचिकाही नार्वेकरांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला.

NCP MLA Disqualification : शरद पवार गटाच्या अपात्रतेबाबतच्या तिन्ही याचिका नार्वेकरांनी फेटाळल्या.

NCP MLA Disqualification : अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवरील निकालाचे वाचन सुरू.

NCP MLA Disqualification : घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा वापर पक्ष चालवण्यासाठी शस्त्रासारखा करू नये, असे निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवले आहे.

NCP MLA Disqualification : पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग होत नाही, असेही नार्वेकर म्हणाले.

NCP MLA Disqualification : राजकीय पक्षातील वाद असून आमदारांची भूमिका ही पक्षांतर्गत बाब आहे. शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे, असे निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवले आहे.

NCP MLA Disqualification : अजित पवार गट हा मुळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आल्या असून अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत.

NCP MLA Disqualification : पक्ष कुणाचा याचा निकाल देताना नार्वेकरांनी विधिमंडळातील आमदारांचे बहुमत विचारात घेतले आहे. शिवसेनेच्याबाबतीत लावलेला निकषच या निकालातही लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

NCP MLA Disqualification : अजित पवार गटाकडे विधिमंडळात बहुमत असल्याने अजित पवार यांचा गट मुळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे स्पष्ट होते.

NCP MLA Disqualification : अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार असल्याचे दिसते. शरद पवार गटाकडूनही 41 आमदारांविरोधात याचिका दाखल केली आहे. यावरूनच कुणाकडे बहुमत आहे हे दिसते. त्यामुळे अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट होते.

NCP MLA Disqualification : विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष समोर असल्याचे विधान नार्वेकरांनी केले आहे.

NCP MLA Disqualification : घटनेनुसार पक्षांतर्गत झालेल्या प्रतिनिधी निवडणुकांचे पुरावे शरद पवार गटाकडून देण्यात आले नाहीत.

NCP MLA Disqualification : अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नसल्याचे नार्वेकरांनी समोर आलेले पुरावे व दोन्ही गटांकडून मांडण्यात आलेल्या बाजूमुळे म्हटले.

NCP MLA Disqualification : 29 जून 2023 पर्यंत शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले नाही. ३० जून रोजी दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला.

NCP MLA Disqualification : दोन्ही गटांकडून घटनेनुसार नेतृत्वाची निवड केल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही गटाकडून याबाबत बाजू मांडण्यात आली.

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीच्या घटनेनुसार कार्यकारी समिती सर्वात महत्वाची असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीच्या घटनेतील महत्वाच्या मुद्यांचे नार्वेकरांकडून वाचन केले जात आहे.

NCP MLA Disqualification : पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. 41 आमदारांनी अजित पवार अध्यक्ष असल्याचा ठराव केला. तसे निवडणूक आयोगाकडे सादर केले. शरद पवार गटाकडूनही तसा दावा करण्यात आला. त्यामुळे पक्षात दोन गट असल्याचे समोर आले. हे 30 जून 2023 रोजी स्पष्ट झाले.

NCP MLA Disqualification : पक्षाची घटना, पदांची रचना, विधिमंडळातील संख्याबळ विचारात घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

NCP MLA Disqualification : दोन्ही गटाकडून मुळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. आमदार अपात्रता निकाल देण्याआधी पक्ष कुणाचा हा निर्णय घ्यावा लागेल, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

NCP MLA Disqualification : शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही विचार केला जाणार आहे.

NCP MLA Disqualification : मूळ पक्ष कुणाचा, याचाही निकाल देणार.

NCP MLA Disqualification : याचिकांचे दोन गट करण्यात आले असून दोन्ही गटांचे स्वतंत्र निकाल असतील, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.

NCP MLA Disqualification : शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात तीन याचिका, तर अजित पवार गटाकडून दोन याचिका.

NCP MLA Disqualification : राहुल नार्वेकरांकडून निकाल वाचनाला सुरूवात...

NCP MLA Disqualification : विधानसभाध्यक्षांनीही विरोधात निकाल दिल्यास शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाऊ शकते.

NCP MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता नार्वेकरांच्या निकालाकडे सर्व नेत्यांचे लक्ष लागले आहे.

NCP MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरूवात होण्याआधी शरद पवार गटाचे नेते 'सिल्व्हर ओक'वर दाखल.

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील होते. ते शरद पवारांसोबत आहेत. तर,व्हीप अनिल पाटील हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे निकाल देताना विधानसभाध्यक्ष नेमका कोणता निकष लावणार, याबाबत उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालाचा परिणाम होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे नार्वेकर त्यांच्या निकालात आयोगाच्या या निकालाचा संदर्भ घेणार का, हे काही वेळात स्पष्ट होईल.

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीलाही न्याय?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला दिलासा दिला. एकाही आमदाराला त्यांनी अपात्र ठरवले नव्हते. या निकालाविरोधात शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असाच न्याय राष्ट्रवादीबाबतही होणार का, याबाबत उत्सुकता आहे.

शरद पवारांबरोबर किती आमदार-खासदार?

  • महाराष्ट्र - 15 आमदार

  • केरळ - 1 आमदार

  • लोकसभा - 4 खासदार

  • महाराष्ट्र विधानपरिषद - 4 आमदार

  • राज्यसभा - 3 खासदार

अजित पवारांबरोबर किती आमदार-खासदार?

  • महाराष्ट्र - 41 आमदार

  • नागालँड - 7 आमदार

  • झारखंड - 1 आमदार

  • लोकसभा - 2 खासदार

  • महाराष्ट्र विधानपरिषद - 5 आमदार

  • राज्यसभा - 1 खासदार

NCP MLA Disqualification : अजित पवारांसह काही आमदारांनी 2 जुलै 2023 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या होत्या.

NCP MLA Disqualification : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांना दिलं होतं. त्यानंतर आज आमदार प्रकरणाचा निकाल आहे. या निकालाकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासह राज्याचं लक्ष लागलं आहे.

NCP MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com