विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कायम चर्चेत असतात. आमदार अपात्रता प्रकरण असो की, सभागृहातील कामकाज, राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा होतच असते. आजही त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. याला निमित्त ठरलंय ते त्यांनी राज्यपाल कार्यालयाला पाठवलेल्या एका ईमेलमुळे. हा ईमेल कारवाईसंदर्भात आहे, पण त्यानंतर लक्षात आलं की, राहुल नार्वेकर यांनी असा कुठलाच ईमेल पाठवला नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. त्याचवेळी राज्यपालांनी कारवाई करावी, असा ईमेल पाठवण्यामागे काय हेतू असावा, याबाबत आता अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या ईमेल आयडीवरून महाराष्ट्राच्या राज्यपालांना ईमेल पाठवण्यात आला होता. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या कार्यालयाने राहुल नार्वेकर यांच्याकडे या ईमेल संदर्भात विचारणा केली. त्यावर असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक झाल्याचे स्पष्ट झाले असून, कुणीतरी त्यांच्या नावावरून ईमेल पाठवून गैरवापर करत आहे.
या प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली आहे. नार्वेकर यांच्या ईमेल आयडीवरून राज्यपालांना पाठवलेल्या ईमेलमध्ये 'काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,' असे लिहिले होते. असा कुठलाही ईमेल नार्वेकरांनी पाठवलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. (Rahul Narwekar Email Hack)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल नार्वेकर यांच्या ईमेल आयडीवरून जसे राज्यपालांना ईमेल पाठवण्यात आले, तसेच इतरांनाही ईमेल पाठवले आहेत का, याचीही माहिती मुंबई पोलिस घेत आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात आणखी कुणाला त्यांचा ईमेल पासवर्ड माहीत आहे का, याचीही माहिती पोलिस घेत आहेत. हे प्रकरण पोलिसांनी सायबर सेलकडे वर्ग केल्याची माहिती मिळत आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.