MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणात शुक्रवारी राहुल नार्वेकर मोठा निर्णय देणार ?

Rahul Narwekar News : मागील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी झाली होती.
Rahul Narwekar News
Rahul Narwekar NewsSarkarnama

Mumbai News : शिवसेनेच्या ५४ आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घ्यायची, की स्वतंत्रपणे याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) उद्या (शुक्रवारी) निर्णय घेण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी झाली होती. सर्व याचिका एकत्रित करून घ्याव्यात कारण सर्वांची याचिका एकाच विषयावर आहे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, तर प्रत्येक आमदाराचे म्हणणे वेगवेगळे असल्याने स्वतंत्र सुनावणी घ्यावी, असा मुद्दा शिंदे गटाने मांडला होता. या वेळी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर नार्वेकर यांनी उद्या याबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.

Rahul Narwekar News
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

उद्धव ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे नव्याने अर्ज दाखल करून अतिरिक्त माहिती आमदारांना नव्याने सादर करायची असल्याचे कळविले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल नार्वेकर यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना आमदारांच्या सुनावणीसंदर्भात नव्याने वेळापत्रक देण्यास सांगितले आहे.

त्यामुळे आता नार्वेकर उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, नार्वेकर हे चंद्रपूर दौऱ्याव होते. या वेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी आमदारांच्या निर्णयाविषयी विचारले असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण काही बोलना नाही, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना माध्यमांशी कमी बोला अशी सूचना केली होती. त्यामुळे उद्याच्या सुनावणीसंदर्भात काय निर्णय होतो, याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आमदारांचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Rahul Narwekar News
Thane politics : देवीच्या मांडवातच राजन विचारेंनी शाब्दिक त्रिशूल उगारला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com