Municipal councillor husband killed : विजयाचा गुलाल उतरतो नाही तोच, थरार; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात घेरलं अन्...

Khopoli Municipal Election: Newly Elected Councillor Mansi Kalokhe Husband Mangesh Kalokhe Murdered : रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणारी खोपोली आज सकाळी नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे.
Mangesh Kalokhe Murdered
Mangesh Kalokhe MurderedSarkarnama
Published on
Updated on

Khopoli municipal election : रायगड जिल्ह्यातील औद्योगिक नगरी खोपोली आज सकाळी हत्येच्या घटनेने हादरली. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांची आज सकाळी हत्या झाली. सकाळी झाल्याने या घटनेने, खोपोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या झाल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही हत्या पूर्वनियोजित होती, असे खोपोली पोलिसांच्या (Police) प्राथमिक तपासात समोर येत आहे.

मंगेश काळोखे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना, वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार जणांनी काळोखे यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. मंगेश काळोखे यांना काही कळण्याच्या आताच, हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले.

हल्लेखोरांनी मंगेश काळोखे यांना बचावसाठी कोणतीच संधी दिली नाही. बेसावध असलेले मंगेश हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले. खोपोली नगरपालिका निवडणुकीत (Municipal Election) मंगेश काळोखे यांच्या पत्नी मिनाक्षी या विजयी झाल्या होत्या. काळोखे यांची राजकीय कारर्किद सुरू होत असतानाच, हा प्रकार घडल्याने काळोखे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.

Mangesh Kalokhe Murdered
Dead Teacher Appointed as Poll Officer : मयत शिक्षक मतदान अधिकारी, आयोग अन् प्रशासन निवडणुकीबाबत किती गंभीर?

मंगेश काळोखेंवर हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, हल्लेखोरांच्या तपासाची पथक नियुक्त करत, कारवाईला सुरूवात केली आहे. पथकाकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी वापरलेले काळे वाहनाचा शोध घेतला जात आहे. जिल्हा पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी आणि संवेदनशील भागात फिक्स पाॅईंट वाढवले आहे. तसंच काळोखे यांच्या घरी देखील पोलिस संरक्षण वाढवण्यात आलं आहे.

Mangesh Kalokhe Murdered
Manikrao Kokate : मंत्रिपद गमावलेले कोकाटे आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद ; दादांनी थोडं बाजूलाच ठेवलं..

या हत्येनंतर खोपोलीत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या खोपोलीला छावणीचे स्वरूप आले आहे. हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलेल्या काळ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. तसंच घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, घटनेच्या तपासाच्या अनुषंगाने काही धागेदोरे हाती लागले आहेत. आरोपींना लवकरच जेरबंद करू, असे खोपोली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com