Raj K Purohit Death : भारतीय जनता पार्टीचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असणारे ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचं निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज के पुरोहित यांचं पार्थिव आज (रविवार १८ जानेवारी २०२६) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
राज के पुरोहित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भुषविलं होते. ते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जायचे. सामान्य कार्यकर्त्ये त्यांना राजभाई म्हणून ओळखायचे. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मोठी पकड होती. शिवाय त्यांचा दक्षिण मुंबईत मोठा दबदबा होता.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 221 मधून राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित हे विजयी झाले आहेत. मुलाच्या विजयानंतर दोन दिवसांनी त्यांचं निधन झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.