Pradeep Sharma: 'मातोश्री'वर हल्ला..., राज ठाकरेंना मारण्याचा प्लॅन होता; प्रदीप शर्मा यांचा गौप्यस्फोट

Encounter specialist Pradeep Sharma reveals shocking plan to attack Raj Thackeray: राज ठाकरे यांना तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही कोकण दौरा रद्द करा, असे सांगितले. त्यानंतर राज यांनी आपला दौरा रद्द केला"
Raj Thackeray, Pradeep Sharma
Raj Thackeray, Pradeep SharmaSarkarnama
Published on
Updated on

वादग्रस्त एन्काऊन्टर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज ठाकरे यांच्या मारण्याचा कट होता, असे शर्मा यांनी सांगितले.मुंबई पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे राज ठाकरे यांचा जीव वाचला, असे शर्मा म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे आदी नेत्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या दहशतवादांच्या कसा एन्काऊन्टर केला, याबाबत शर्मा यांनी सविस्तर सांगितले.

भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्या घराखाली दाऊदचे शूटर होते. आम्ही तिथून त्या लोकांना पकडलं होतं,, अशी माहिती प्रदीप शर्मा यांनी मुलाखतीत दिली. शर्मा यांनी मुलाखतीत मातोश्रीवर झालेल्या हल्ल्याच्या कटाचा व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरचा अनुभव सांगितला.दाऊदचे शूटर, मुंबईतील बॉम्बस्फोट आणि विविध एन्काऊंटरबद्दल सविस्तर माहिती उघड केली.

प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘अब तक ११२’ हा सिनेमा येत आहे. यानिमित्ताने शर्मा यांच्याशी संवाद साधण्यात आला. यात त्यांनी अनेक एन्काऊन्टरबाबत दावा केला. या मुलाखतीत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर दहशतवादी करणार होते, त्यांचा कसा एन्काऊंटर केला याबाबत शर्मा यांनी सांगितले.

Raj Thackeray, Pradeep Sharma
Yashwant Sugar Factory: 'यशवंत'च्या सभेत पुन्हा गोंधळ; अवघ्या पाच मिनिटात गुंढाळला गाशा; नेमकं काय घडलं?

'मातोश्री'वर हल्ल्यांचा कट

मुलुंडला 2003 रेल्वेमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. त्यातील आरोपी पाकिस्तानी आणि काश्मिरी होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ते हल्ला करण्याचा त्याचा डाव आहे.

पोलिसांना त्यांच्या वाहनाचा क्रमांक मिळाला होता. आर. एस. शर्मा तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. ज्यांनी सांभाळून जा असे सांगितले. बुलेटप्रुफ जॅकेट घालून गेलो. हल्लेखोरां सोबत दुपारी १२ वाजता झालेल्या चकमकीत तेव्हा दोन गोळ्या किटला लागल्या. आम्ही त्यांचा एन्काऊंटर केला. गोरेगाव महामार्गावरील महानंदा डेअरीजवळ हा एन्काऊंटर केला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला मातोश्रीवर चहा प्यायला बोलावून बाळासाहेब ठाकरे यांची भेट घालून दिली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Raj Thackeray, Pradeep Sharma
Dadar Kabutarkhana: कारंज्याचा झाला कबुतरखाना; करुणेचे राजकारण नको!

राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख...

प्रदीप शर्मा म्हणाले, "आम्ही 10-12 नंबर इंटरसेप्ट करत होतो. तेव्हा अचानक राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख होऊ लागला. त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती समजली. राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते. त्यांना मारण्याचा तो कट होता. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आमच्या लक्षात आले. तेव्हा सह पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आम्ही ही माहिती दिली. आयुक्तांनी राज ठाकरे यांना तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही कोकण दौरा रद्द करा, असे सांगितले. त्यानंतर राज यांनी आपला दौरा रद्द केला,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com