मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी याच विधानावरुन कोश्यारी यांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील घणाघाती टीका केली. आपलं वय काय? आपण बोलतो काय? राज्यपाल पदावर बसलात म्हणून तुमचा मान राखतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही अशा शब्दांत ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. ( Raj Thackeray attacked on Governor Bhagat singh Koshyari)
राज ठाकरे (Raj thackeray) हे मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी, उध्दव ठाकरे, हिंदुत्व, भगतसिंग कोश्यारी यांच्यावर झोड टीका केली. ठाकरे म्हणाले, वय काय बोलता काय राज्यपाल पदावर आहात म्हणून तुमचा मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. महाराष्ट्र काय आहे हे आम्हांला कोश्यारींकडून एेकायचं नाही. गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात का आले हे त्यांना विचारलं पाहिजे. महाराष्ट्र सुपीक आहे म्हणून तर इतर परप्रांतीय इकडे येताहेत असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
हल्ली कोणी काहीही बरळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खूप खालावत चालली आहे. त्याला मर्यादा राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे प्रवक्ते देखील काहीही बोलत सुटतात. आजपर्यंत कधी मी पाहिलेलं नव्हतं. ते आज घडत आहे. या राज्यातील एक मंत्री महिला लोकप्रतिनिधीला भिकारचोट म्हणतो. अरे पण तू कोण? तुझी लायकी काय? आपण काय बोलत आहोत, याचे भानही त्यांना राहत नाही अशा शब्दांत राज ठाकरेनी मंत्री अब्दुल सत्तारांचा ( Abdul Sattar) देखील खरपूस समाचार घेतला.
स्वार्थ आणि पैशांसाठी.. उध्दव ठाकरेंवरही टीकास्त्र
हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का? त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही, आणि त्यांना घ्यायची देखील नाही. फक्त स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या. कधी हा तर कधी तो असं करत सत्तेत बसायचं. पाकिस्तानी कलाकार जेव्हा भारतात धुडगूस घालत होते, तेव्हा त्यांना देशातून हाकलून लावण्याचं काम मनसेनं केलं तेव्हा हे हिंदुत्ववादी कुठे होते असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला. पण आता तेच म्हणताहेत राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले, पण मी आधीपासूनच हिंदुत्ववादी आहे. माझा जन्म हा एका हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी घरात झाला आहे असेही राज ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.