'शिवतीर्थ'वर घडामोडींना वेग; पदाधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे राज ठाकरेंचे आदेश

Raj Thackeray| MNS| Political news| राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषदेत आपल्या अयोध्या दौऱ्याची आणि औरंगाबाद दौऱ्याची घोषणा केली होती.
raj thackeray | Shivtirth
raj thackeray | Shivtirth

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज त्यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. औरंगाबाद येथे होणारी 1 मेची सभा आणि मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा, सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवर होणार चर्चा होणार आहे. या बैठकीला मुंबईतील पदाधिकारी, नेते, सरचिटणीस, विभाग अध्यक्षांसोबत ही बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषदेत आपल्या अयोध्या दौऱ्याची आणि औरंगाबाद दौऱ्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने या दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक बोलावली जात असल्याचा चर्चा आहे. राज ठाकरेंच्या आव्हानानंतर राज्य सरकारकडून भोंग्याबाबत ठरवण्यात येणाऱ्या धोरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, राज्य सरकार आणि नाशिक पोलिसांनी धार्मिक स्थळांवरीवर लाऊड स्पिकरबाबत काही आदेश दिले आहेत. या विषयांवरही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीतून राज ठाकरेंची पुढची रणनिती काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

raj thackeray | Shivtirth
अखेर राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित अयोध्या दौरा ठरला; केली मोठी घोषणा

राज ठाकरे यांनी नुकतीच पुणे दौऱ्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. अयोध्येला 5 जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोबत जाणार आहे. तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत मनसेच्या नेत्यांकडून सतत सांगितलेही जात होते. पण कोरोना व इतर कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबला होता. अखेर त्यांचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येत भव राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. तिथे जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे राज ठाकरे यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com