Sanjay Raut: राऊतांनी सांगितले ठाकरे-फडणवीस भेटीमागचं कारण

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघर गणपती येतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.
Devendra Fadnavis, Raj Thackeray
Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीआधी झालेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. एकाही जागेवर उद्धव ठाकरेंना खाते उघडता आले नाही. राज ठाकरेच्या उमेदवारांची तिच परिस्थिती झाली. बेस्टच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षां बंगल्यावर त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरे यांच्या भेटी दरम्यान राज्यासंदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा केली असेल, असे राऊत म्हणाले. त्यांनी मुंबईची तुंबई झाल्यावरुन महायुती सरकारला धारेवर धरले. ‘ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात आता नुकतीच मुंबई बुडाली, दोन दिवस मुंबई, ठाणे, नाशिकसारखी शहरं बुडाली. ते पाहता या भेटीत राज्यातील प्रश्नांवर त्यांची चर्चा झाली असेल, असे राऊत म्हणाले. आम्हाला त्रास झाला आहे का? आम्हाला माहितीये काय आहे या भेटीमागचं कारण...आणि आम्ही ते का सांगू?’ असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील नागरी समस्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची चर्चा सुरू असताना या भेटीला महत्त्व आले आहे. खासदार संजय राऊत यांनाी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या मुद्दावर जोरदार कोपरखळी मारली. त्यांनी भाजपला असा खास चिमटा काढला.

राज ठाकरे आणि फडणवीस अनेकदा भेटले आहेत. सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघर गणपती येतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. या भेटीबद्दल राज ठाकरेच अधिक सांगू शकतील, असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, "राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत,कुठल्याही पक्षाचे मुख्यमंत्री नाही. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. दोन मोठे नेते भेटत आहेत. एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे हे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणताय. या भेटीत काय चर्चा झाली, कोणत्या विषयावर काय बोलणे झाले हे राज ठाकरे सांगतील. ते परखड नेते आहेत"

Devendra Fadnavis, Raj Thackeray
MLA Shankar Jagtap: अष्टपैलू खेळाडू ते चिंचवडचे आमदार

मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझं काही काम असेल. उद्धव ठाकरे यांचं काही काम असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही. तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, असे संजय राऊत म्हणाले. या निवडणुकीत भाजपने काय साध्य केले, आगामी मुंबई महापालिका निवडणुकी पूर्वी ही बेस्टची निवडणूक हि लिटमस टेस्ट ठरली आहे.बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, असा नॅरटिव्ह सेट होतो की काय असे चित्र सध्या महायुतीतील नेत्यांनी निर्माण केले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com