Raj Thackeray : विधानपरिषदेला माघार, आता थेट CM शिंदेंविरोधात 'हा' शिलेदार लढणार? राज ठाकरेंचा 'ठाणे पॅटर्न'

Assembly Election 2024 : राज ठाकरे यांनी विधानसभेच्या रिंगणात यापूर्वीच सहा उमेदवारांना उतरवलं आहे. यातच थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदारसंघात मनसेनं उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
eknath shinde | raj thackeray.jpg
eknath shinde | raj thackeray.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभेची आढावा बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचा उमेदवार ठरल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानसभेच्या दृष्टीनं मुंबई, पुणे, ठाणे या विभागाची आढावा बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे-पालघर, पुणे शहर आणि ग्रामीणमधील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पानसे यांना उमेदवारी देण्याबाबतच अहवाल प्राप्त झाला आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी निरीक्षकाकडून हा अहवाल घेतला आहे.

eknath shinde | raj thackeray.jpg
Maharashtra Politics : ...तर राज ठाकरेंची मनसे देखील तिसऱ्या आघाडीत, राजू शेट्टींनी स्पष्टचं सांगितलं

पदवीधर मतदारसंघातून माघार आता विधानसभेच्या रिंगणात

कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना निरंजन डावखरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विनंती केली. त्यानंतर अभिजीत पानसे यांनी पदवीधरच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात पानसे यांना 'फिक्स' मैदानात उतरविण्यात येते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com