Raj Thackeray: राज ठाकरेंची भीती अवघ्या 24 तासांत खरी ठरली : जुन्या शिलेदाराला शिंदेंनी पळवलं; रातोरात उरकला पक्षप्रवेश

Thackeray Sena MNS alliance MNS leader quits: राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मनसेच्या वरिष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Thackeray Sena MNS alliance MNS leader quits news
Thackeray Sena MNS alliance MNS leader quits newsSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray MNS news: 'महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्या आहेत. त्यात आता दोन नवीन टोळ्यांची भर पडली . या टोळ्या राजकीय पक्षातील 'मुले'पळवत आहेत,' अशी भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी ठाकरे सेना-मनसे युतीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राज यांनी दुपारी जी भीती व्यक्त केली, ती रात्री उशीरा खरी ठरली.

राज ठाकरे यांचे जुने, विश्वासू सहकारी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सचिव सुधाकर तांबोळी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी रात्री उशीरा मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सुधाकर तांबोळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

सुधाकर तांबोळी हे विद्यार्थी चळवळीपासून राज ठाकरे यांच्यासोबत होते. मनसे स्थापनेनंतर तांबोळी यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. राज ठाकरे यांनी त्यांना महाराष्ट्र सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली होती.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला. पण या आनंदाच्या वातावरणानंतर 24 तासाच्या आतच सुधाकर तांबोळी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. युती जाहीर होताच काही तासातच मनसेच्या एका कट्टर नेत्याने राज ठाकरे यांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Thackeray Sena MNS alliance MNS leader quits news
Bhagyashree Jagtap: विजयाचा गुलाल उधळल्यानंतर 24 तासातच त्या पुन्हा हातगाडीवर करताहेत फळविक्री

राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातच मनसेच्या वरिष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेसेना-मनसेच्या युतीनंतर काही तासातच तांबोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यामागे नेमके कारण का? तांबोळी हे मनसेमध्ये नाराज होते का असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. मनसेकडून सलग दो टर्म सिनेट सदस्य म्हणून सुधाकर तांबोळी हे निवडून आले होते. विशेष करुन संघटनात्मक कामासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

काय म्हणाले होते राज ठाकरे...

महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्या आहेत. त्यात आता दोन नवीन टोळ्यांची भर पडली. या टोळ्या राजकीय पक्षातील 'मुले'पळवत आहेत, जे निवडणुका लढवणार आहे त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल, फाॅर्म कधी भरायचे ते कळवूच असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com