Bhagyashree Jagtap: विजयाचा गुलाल उधळल्यानंतर 24 तासातच त्या पुन्हा हातगाडीवर करताहेत फळविक्री

Lonavala Nagar Parishad Corporator Bhagyashree Jagtap: निवडणूक प्रचार काळातही त्यांनी आपल्या फळविक्रीचा व्यवसाय सुरुच ठेवला. प्रचाराच्या दिवसात त्या त्या सकाळ–दुपारी पेरू विक्री करून संसार चालवत, तर संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करत होत्या.
Lonavala Nagar Parishad Corporator Bhagyashree Jagtap
Sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे (पुणे): नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहे. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ 24 तास उलटत नाहीत तोच एक नगरसेविका आपल्या हातगाळीवर फळविक्री करताना दिसल्या.

संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मावळ व लोणावळा परिसरात त्यांच्या साधेपणा, कष्ट व लोकशाही मूल्यांची विशेष चर्चा होत आहे. 'मतदारांनी दाखवलेल्या विश्वासास सार्थ ठरवत, आपला मूळ व्यवसाय कधीही सोडणार नाही,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवून भाग्यश्री जगताप या आपल्या मुळ फळविक्रीचा व्यवसाय ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी पोहचल्या अन् नगरसेविका झाल्यानंतरही हा व्यवसाय अभिमानाने सुरू ठेवत राजकारणातील सकारात्मक चित्र उभे केले आहे. गेल्या २० वर्षांपासून फळविक्रीच्या व्यवसायातून त्या संसाराचा गाडा चालवत आहेत. राजकारणात एन्ट्री करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांसमोर भाग्यश्री जगताप या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

भाग्यश्री जगताप या सकाळी-दुपारी पेरु विक्री करताता, त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्या आपली उपजीविका चालवतात. निवडणूक प्रचार काळातही त्यांनी आपल्या फळविक्रीचा व्यवसाय सुरुच ठेवला. प्रचाराच्या दिवसात त्या त्या सकाळ–दुपारी पेरू विक्री करून संसार चालवत, तर संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करत होत्या.

Lonavala Nagar Parishad Corporator Bhagyashree Jagtap
MNS: आदल्या दिवशी भावनिक पोस्ट, दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; मनसे नेत्यावर काळाचा घाला

त्या खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासी पट्ट्यातील रहिवासी आहेत. प्रचारादरम्यान या भागात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत होते. आमदार सुनील शेळके यांनी भाग्यश्री जगताप यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती.

नगरसेविका झाल्यानंतरही त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय न सोडता, निकाल जाहीर होताच हातगाडी लावून पुन्हा व्यवसाय सुरू केला, हे विशेष उल्लेखनीय ठरले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून लढविणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना १४६८ मते मिळाली, तर भाजपच्या रचना विजय सिंनकर यांना ८६० मते मिळाली. ६०८ मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com