Raj Thackeray : सर्व शाळांमध्ये 10 वीपर्यंत मराठीची सक्ती करा; राज ठाकरे भाषेच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक

Raj Thackeray On Marathi language : हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही, राज ठाकरे यांचं मोठं विधान
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईत सुरू असलेल्या द्वितीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली. या संमेलनात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावर भाष्य करीत हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नसल्याचं विधान केलं. तसेच मराठी भाषेच्या विषयासंदर्भात आपण अनेक केसेस अंगावर घेतल्या असून मी कडवट मराठी असल्याचं सांगितलं. याबरोबरच सर्व शाळांमध्ये 10 वीपर्यंत मराठीची सक्ती करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. (Raj Thackeray On Marathi and Hindi language)

'पंतप्रधान मोदींना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल आपुलकी वाटते, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावा वाटला, तसेच 'गिफ्ट सिटी'देखील गुजरातमध्ये बांधावी वाटली, मग पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल असणारं प्रेम लपवता येत नाही, तर मग आपण का लपवतोय? असा सवालच राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Satara News : प्रभाकर देशमुखांना वाद टाळायचाय… पण शंभूराज देसाई आता काय करणार?

महाराष्ट्रात जेव्हा हिंदी भाषा ऐकू येते, तेव्हा त्रास होतो. आपला हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, हिंदी भाषेचा देशात कधी राष्ट्रभाषा म्हणून निवाडा झालेलाच नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संभाषणांसाठी भाषा आहे, असं मत ठाकरेंनी या संमेलनात मांडलं.

आजही मराठी भाषा बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. 'सीबीएससी'कडे पहिली ते 10 वीपर्यंत मराठीची सक्ती करा, येथे फ्रेंच, जर्मन भाषा शिकवतात. आणखी खूप भाषा शिका. मात्र आधी मराठी शिका, असं आवाहन करीत 'सीबीएससी'मध्येदेखील पहिली ते 10 वीपर्यंत मराठी भाषेची सक्ती करण्याची मागणी राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.

महाराष्ट्रात एखादा मराठी माणूस घर घ्यायला जातो, पण सोसायटीमधील काही जैन माणूस मराठी माणसाला घर नाकारतो. हेच गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश, केरळमध्ये करून दाखवा. तेथे पैसे देऊनदेखील घर दिलं जात नाही. महाराष्ट्रात मात्र हे होतं. कारण आपलं धोरण बोटचेपे आहे. आपण मागे हटतो, असं ठाकरे म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Raj Thackeray
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निर्णयावर नारायण राणे नाराज? म्हणाले, 'सरकारच्या निर्णयाशी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com