Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निर्णयावर नारायण राणे नाराज? म्हणाले, 'सरकारच्या निर्णयाशी...'

Narayan Rane on Maratha Reservation : राज्‍य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी घेतलेल्‍या निर्णयाशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया राणे यांनी दिली.
Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मराठाबांधवांच्या आंदोलनाला मोठं यश आलं. जरांगे-पाटील यांच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या. यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे 'सगेसोयरे' यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. ही मागणी मान्य झाल्याची अधिसूचना सरकारने काढली.

यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले. सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाज लढाई जिंकल्याचा जल्लोष करीत आहे. मात्र, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजप नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Narayan Rane on Maratha Reservation)

राज्‍य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी घेतलेल्‍या निर्णयाशी व दिलेल्‍या आश्वासनाशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्‍चीकरण होत असून इतर मागास समाजावर अतिक्रमण होत असल्यामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो, अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबरोबरच सोमवारी (दि. 29 जानेवारी) आपण सरकारने घेतलेल्या निर्णयावर पत्रकारपरिषद घेऊन सविस्‍तर बोलणार असल्याचेही नारायण राणे यांनी 'एक्स'वर सांगितले आहे. दरम्यान, मंत्री राणे यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

नारायण राणे यांचं ट्विट काय ?

"मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवारी (दि. 29 जानेवारी) मी यावर पत्रकारपरिषद घेऊन सविस्‍तर बोलेन," असं 'एक्स'वर (ट्विट) नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Narayan Rane
Manoj Jarange Patil : राज ठाकरेंचा मनोज जरांगे-पाटलांना सल्ला; म्हणाले, 'आता फक्त आरक्षण...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com