गणेश नाईक अडचणीत : पीडितेच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

गणेश नाईक हे गेली २७ वर्ष माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आम्हा दोघांना एक मुलगा आहे. मात्र, ते आता तो मान्य करीत नाहीत, असा खळबळजनक आरोप या महिलेने केलेला आहे. 
Ganesh Naik
Ganesh Naik Sarkarnama
Published on
Updated on

अलिबाग : नवी मुंबईतील  भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरोधात महिला आयोगाकडे एका पीडितेने तक्रार दिली आहे. त्याची गंभीर दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांना कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी आपल्याला दमदाटी केली असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. (Woman's complaint against former minister Ganesh Naik to Women's Commission)

गणेश नाईक हे गेली २७ वर्ष माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आम्हा दोघांना एक मुलगा आहे. मात्र, ते आता तो मान्य करीत नाहीत, असा खळबळजनक आरोप या महिलेने केलेला आहे.  पीडित आणि तिच्या मुलाला नाव मिळावे, यासाठी ती महिला पाठपुरावा करीत आहे. मात्र पीडितेला गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाकडून दमदाटी केली जात असल्याचे संबंधित महिलेने आयोगाला दिलल्या तक्रारीत म्हटले आहे.

Ganesh Naik
आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची माझी इच्छा : जयंत पाटलांनी केले कौतुक

दरम्यान,  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे आज (ता. १२ एप्रिल) संबंधित पिडीत महिलेने तक्रार अर्ज सादर केला आहे. त्याची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी पोलिस विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती चाकणकर यांनी अलिबागमध्ये बोलताना दिली.

Ganesh Naik
जयंत पाटलांची ‘एबी फाॅर्म’ घेऊन जायची ऑफर..!

तत्पूर्वी संबंधित पीडित ४७ वर्षांच्या महिलेने या प्रकरणी गणेश नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दिलेली आहे. थेट पोलिस ठाणे गाठून पोलिसांपुढे तक्रारींचा पाढा वाचला होता. मात्र, गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीपुढे आपले गाऱ्हाणे मांडले होते. आम्ही गेल्या २७ वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहात आहोत. याच काळात आम्हाला एक मुलगा झाला आहेत. या मुलाला त्या नेत्याने हक्क देणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत आणि आमच्यातील नात्याची वस्तुस्थिती मान्य करीत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com