Raj Thackeray : उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी कबुतराचा मुद्दा उचलला, जैन समाजाला दिल्या कानपिचक्या

Raj Thackeray statement : आपण कबूरत, हत्ती अशा विषयांमध्ये अडकलो आहोत. त्यामुळे महत्वाच्या विषयांकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी जैन समाजाला स्पष्टपणे खडेबोल सुनावले.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात शुक्रवारी वर्षा बंगल्यावर भेट झाली. आगामी निवडणुकांमध्ये राज-उद्धव मनोमिलनाच्या चर्चा होत असताना या भेटीला विशेष महत्व होतं. त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. दोघांमध्ये आज तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारपरिषद घेत या भेटीविषयी सांगताना राज ठाकरे यांनी राजकीय भाष्य टाळत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखान्याच्या वादावर भाष्य केलं.

राज ठाकरे यांनी रस्त्यांवर कबुतरांना दाणे खायला घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला आपल्या शैलीत कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे म्हणाले की, मला एक गोष्ट कळत नाही. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण काय करतो. नाय नाय.. गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? नाही ना.. मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले, काय त्या कबुतरांचं. माणसं मेली तरी चालतात पण कबूतरं मेली नाही पाहीजे. आज रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहे का? हा सगळा राजकीय विषय आहे हे, मला माहित होतं. काही जणांना कबुतरांचा मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. पण ज्यांना यावरुन राजकारण करायचं होतं त्यांच्या लक्षात आलं की यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळत नाही. पण, कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Vaishali Suryawanshi BJP : वैशाली सूर्यवंशींनी भाजपचा झेंडा हाती घेताच वारे बदलले, कुणाची अडचण होणार?

कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला. जैन मुनींनी देखील याप्रकरणात काही धक्कादायक विधाने केली. काही जैन बांधवांनी दादर कबुरतखाना परिसरात महापालिकेने लावलेली ताडपत्री फाडून टाकत कबुतरांना धान्य टाकले. दादर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मराठी एकीकरण समितीनेही आक्रमक होत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या काही लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यावरुन मराठी व हिंदू बांधवांनी पोलिसांवर टीका केली.

Raj Thackeray
Chhagan Bhujbal Politics: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नथीतून भुजबळांचा गिरीश महाजनांवर राजकीय बाण?

हे सगळं सुरु असताना मनसेकडून कबुतरखाना प्रश्नावर कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. मात्र आता राज ठाकरे यांनी कबुरतखाना वादावर थेट भाष्य केलं आहे. एकप्रकारे त्यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com