Thane Political News : कल्याणचे श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी श्रीकांत शिंदेंनी मनसेचे आमदार राजू पाटलांसह Raju Patil कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच आमच्यातील कटुता कमी झाली असून फेव्हिकोलच्या जोडासारखी मैत्री निर्माण झाल्याचेही सांगितले. यावर राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंची भर सभेत फिरकी घेतली.
श्रीकांत शिंदे Shrikant Shinde म्हणाले, आजपर्यंतची शिवसेना आणि मनसेतील कटुती संपुष्टात आली आहे. आता लोकसभेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र एक करून काम केले असून त्यांचे आभार मानतो. आता आगामी निवडणुकीत मनसेला मनापासून साथ देणार आहे. तसेच राजू पाटलांकडे पाहत, आता शिवसेना आणि मनसेची मैत्री फेव्हिकोलच्या जोडासारखी झाली आहे, असेही ते म्हणाले. यावर पाटील हसल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
फेव्हिकोलचा जोड यावरून राज ठाकरेंनी Raj Thackeray श्रीकांत शिंदेंची चांगलीच फिरकी घेतली. भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले, श्रीकांतने फेव्हिकोलच्या जोडाचा उल्लेख केला. आगामी निवडणुकीत त्यांनी हे फेव्हिकोल आम्हाला आतून लावावे. नाहीतर बाहेरुन लावाल आणि बाहेरच ठेवाल, असे ठाकरे म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. त्यावेळी कोण कुणाच्या पक्षात आहे, हे समजायला तयार नाही. महायुतीत असलेल्या छगन भुजबळ Chhagan Bhujbal, नारायण राणे यांनीही शिवसेना सोडल्यावरून त्यांनी टोला लगावला.
यावेळी ते म्हणाले, माझा महायुतीला बाहेरून पाठिंबा आहे. त्यामुळे मी कुणालाही काहीही बोलू शकतो. आपल्याला थोडीच फेव्हिकॉल अजून लागला आहे, असे म्हणत त्यांनी श्रीकांत यांच्याकडे पाहिले. त्यावेळी शिंदेंनी हात जोडले. यावेळी कुणालाच हसू आवरता आले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.