Raj Thackeray Sabha : शरद पवारांनी राज्यात पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण केलं; राज ठाकरेंनी सगळंच काढलं

Shrikant Shinde, Naresh Mhaske : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे राज ठाकरेंची सभा झाली. या सभेनिमित्त राज ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते.
Raj Thackeray, Sharad Pawar
Raj Thackeray, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : सध्या राज्यात कोण कोणाबरोबर आहे, हे समजत नाही. मला फोडाफोडीचे राजकारण कधीही मान्य नाही आणि ते होणारही नाही. आता जे बोलतात आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला त्यांनी एकमेकांकडे पाहावे. उद्धव ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक फोडले. तर राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचे राजकारण कुणी केले असेल तर ते म्हणजे शरद पवारांनी. काँग्रेस फोडून त्यांनी राज्यात पुलोदचे सरकार स्थापन केले, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray केला.

कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे राज ठाकरेंची सभा झाली. यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा जाहीरपणे समाचार घेतला. ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. तेव्हा त्यांना काही नाही वाटले. त्यांच्यासोबत शरद पवार बसले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरुवात केली असेल तर शरद पवारांनी Sharad Pawar. त्यानंतर त्यांनी पुलोद स्थापन केले.

ठाकरेंसोबत असलेल्या पवारांनी 1991 मध्ये पुन्हा छगन भुजबळांना Chhagan Bhujbal फितवले आणि बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणेंना बरोबर घेत काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यावेळी आजचे फोडाफोडीच्या राजकारणावर टाहो फोडणारे नेतृत्व कुठे दिसत नव्हते, असा टोलाही राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray, Sharad Pawar
Kejriwal Vs Modi : अरविंद केजरीवाल यांचे 'या' 10 गॅरंटीतून थेट PM मोदींना चॅलेंज!

राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. यावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यभर रान पेटवले आहे. याकडे लक्ष वेधत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कसे फोडाफोडीचे राजकारण केले, याची यादीच दिली.

Raj Thackeray, Sharad Pawar
Jalna Loksabha Constituency : अपक्ष उमेदवाराने पाठिंबा जाहीर केल्याची खोटी पोस्ट, आरोपीवर गुन्हा दाखल..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com