Raj Thackeray News : राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालय आणि मनसैनिकांचेही यासाठी मानले आभार

Supreme Court Marathi Board Decision : मराठी पाट्यांसाठी मनसेच्या वतीने मुंबईत केलेली खळ्ळ खट्याक आंदोलने चांगलीच गाजली.
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama

Mumbai News : मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने मुंबईत केलेली खळ्ळ खट्याक आंदोलने चांगलीच गाजली. त्याविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत, असे शिक्कामोर्तब केले. त्याबद्दल राज ठाकरे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

पुढील दोन महिन्यांत महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापन यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार अशी पोस्ट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर आज शेअर केली. 'मराठी पाट्या' या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्षे जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. 'मराठी पाट्या'बाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच असेच सतर्क राहिलात तसंच पुढेदेखील राहिलं पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray News
BJP ON Gholap: मुलीनंतर भाजपने फेकले माजी मंत्री घोलप यांच्यावर जाळे!

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकाने, आस्थापन यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला ? अशी विचारणा त्यांनी केली. महाराष्ट्रात असाल, तर मराठीत इतर राज्यात असाल, तर तिथल्या भाषेत पाट्या असणे किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणे यात विरोध करण्यासारखे काय होते, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता, तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असे त्यांनी ठासून सांगितले.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पण यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, असे राज यांनी ठासून सांगितले. हे पाहणे आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलिस प्रशासनाचं काम आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दुकानदारांनी पण नुसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले. इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे पण लक्ष असेल हे विसरू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Raj Thackeray News
Amit Thackeray News : नाशिकचा गणपती अमित ठाकरेंना पावेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com