‘कृष्णकुंज’ सोडण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

राज ठाकरे हे दिवाळी पाडवा किंवा भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणार आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘कृष्णकुंज’ म्हटलं की राज ठाकरे आणि राज ठाकरे म्हटलं की ‘कृष्णकुंज’... हे आपोआप ओटावर येते. दादरमधील शिवाजी पार्कच्या शेजारी राज यांचे हे निवासस्थान आहे. पण, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे कृष्णकुंज हे निवासस्थान सोडून नव्या घरात प्रवेश करणार आहेत. दिवाळी पाडवा किंवा भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि कुटुंंबीय नव्या घरात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Raj Thackeray will enter the new house on the occasion of Diwali Padva)

राज ठाकरे यांचा बालपणापासून मनसे अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कला लागून असलेल्या ‘कृष्णकुंज’ने पाहिला आहे. राज यांना भेटण्यासाठी अनेक मोठ्या हस्ती या थेट ‘कृष्णकुंज’वर येत असत. पण, मनसे प्रमुख आता नव्या घरात राहायला जाणार आहेत. ही पाच मजली इमारतही शिवाजी पार्कला लागूनच असून सध्याच्या कृष्णकुंज या निवासस्थानाच्या शेजारीच आहे. बड्या नेत्यांसह राज्यातील मनसे कार्यकर्त्यांचा राबता हा कायम ‘कृष्णकुंज’वर असतो. आता तो नव्या घरीही राहणार आहे. त्यामुळे ‘कृष्णकुंज’ याप्रमाणेच नव्या घराचीही ओळख निर्माण होणार आहे.

Raj Thackeray
शिवसेनेला राज्याबाहेर पहिला खासदार मिळवून देण्यात पिंपरीकरांचा सिंहाचा वाटा!

दरम्यान, कृष्णकुंज या निवासस्थानाशेजारीच असलेल्या राज ठाकरे यांच्या या नव्या पाच मजली इमारतीचे नाव काय असणार आहे, याची उत्सुकता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील राजप्रेमींना लागली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय नव्या घरात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray
पेट्रोल, डिझेलचे कर कमी झाले अन् पी.चिदंबरम म्हणाले, आमचं म्हणणं खरं ठरलं!

नव्या इमारतीत मनसेच्या मुख्य कार्यालयासह ग्रंथालयही

व्यंग्यचित्र काढणे हा राज ठाकरे यांचा छंद आहे. वाचन करणेही त्यांना आवडते, त्यामुळे राज यांच्या नव्या इमारतीमध्ये एक मोठे ग्रंथालयही असणार आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्ष असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्य कार्यालयही याच इमारतीमध्ये असणार आहे. त्यामुळे ‘कृष्णकुंज’प्रमाणेच नवे घरही अगदी पहिल्या दिवसापासून कार्यकर्त्यांनी गजबजून जाणार, यात कोणतीही शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com