हिंदुहृदयसम्राट म्हणून लागले राज ठाकरेंचे बॅनर

घाटकोपरमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते मनसेच्या (MNS) कार्यालयचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट असे म्हणत होते. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आता चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. आज (ता.14 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर ठाकरेंच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा चांगलीच रंगत आहे.

Raj Thackeray
नारायण राणेंना होम पिचवरच महाआघाडीचा मोठा धक्का

ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात बॅनर्स लावले असून यामवर चक्क ठाकरेंच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लावण्यात आले आहे. यामुळे अनेकांचे लक्ष हे बॅनर्संनी वेधत असून या बॅनर्सची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वचा मुद्दा बाहेर काढला जात आहे. त्यातच थेट राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुहृद्यसम्राट म्हटल्याने या बॅनर्स लावण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे हिंदूत्वाकडे झुकताना दिसत आहेत. काही दिवसापुर्वी मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा करण्यात आला होता. त्यावेळी मनसे हे हिंदूत्वाकडे झुकल्याच्या चर्चा जोरात रंगल्या होत्या. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि अनपेक्षितपणे शिवसेनेने कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडी तयार करुन सत्ता स्थापन केली.त्यामुळे शिवसेनेच्या हिंदूत्वावर भाजपकडून टीका करण्यात येत असतांना नेमक्या याच वेळी मनसेकडून शिवसेनेचे हिदूत्व हायजॅक करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. आता तर मनसे कार्यकर्त्यांनी थेट राज ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हटल्याने राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा रंगत आहेत.

Raj Thackeray
Video: राज ठाकरेंनी आजवर असं काय केलय?; मनीषा कायंदेंची टीका

दरम्यान, राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये मनसे कार्यकर्ते ही जोरजार निवडणुकीच्या तयारीली लागले आहेत. मुंबई महापालिकेत आजघडीला शिवसेनेची सत्ता आहे. ती राखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असून भाजपकडून शिवसेनेला घेरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्यतंरी मनसे, भाजपच्या युतीसंदर्भात चर्चा रंगत होत्या. मात्र, दोन्ही पक्षाकडून युतीबाबत कुठलीही बोलणी न झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मनसेला या निवडणुकीत एकट्याने लढण्याचे आदेश पक्षप्रमुख ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. याबरोबरच राज ठाकरेही गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेले बघायला मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com