Political News : राज ठाकरेंच्या मुलीला केलं जातेय ट्रोल?; 'नको त्या' मेसेजमुळे शर्मिला ठाकरे संतप्त

Raj Thackrey : गेल्या काही दिवसापासून अशा घटनांना राजकीय नेत्यांच्या मुलींना सामोरे जावे लागत असल्याचे पुढे आले आहे.
Sharmila Thackrey
Sharmila ThackreySrakarmana
Published on
Updated on

Political News : सोशल मीडियावरील पोस्ट व इतर कोणत्याही माध्यमावर व्यक्त होत असताना मुलींना काळजी घ्यावी लागत आहे. त्यांना विविध कारणाने ट्रोल करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसात वाढला आहे. विशेष म्हणजे सर्वांनाच यामधून जावे लागत आहे. गेल्या काही दिवसापासून अशा घटनांना राजकीय नेत्यांच्या मुलींना सामोरे जावे लागत असल्याचे पुढे आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिलाही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाईट व नको ते मेसेज येत असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी मी पोलीस आयुक्तांकडे अनेकदा तक्रार केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharmila Thackrey
Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये भाजप सरकारचा 'महाराष्ट्र' पॅटर्न..!

सांताक्रूझच्या एसएनडीटी महाविद्यालयात जाऊन जैन तेरापंथ समाजाचे राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी यांचे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackrey ) यांनी दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वीच जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी मनोहर गोखरू, भूपेश कोठारी, ललित जैन आणि दीपक संदाडिया यांनी शिवतीर्थ येथे भेट घेऊन राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना राष्ट्रीय संतांना भेटण्याचं आमंत्रण दिले होते. यावेळी शर्मिला ठाकरे या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

राज ठाकरे (Raj Thackrey ) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना यावेळी डीपफेकबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शर्मिला ठाकरेंनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मीही अशाप्रकारातून जात आहे. माझ्या मुलीला युट्यूबवर मुले नको ते मेसेज करत असतात. मी स्वतः पोलीस आयुक्तांना याबाबत तक्रार केली. त्यांनी या प्रकरणी अटकही केली. ब्रिटीशकालीन कायदा इतका तकलादू आहे की, कितीही अटक केली तरी सोडावे लागले."

याप्रकरणी कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात विधानसभेत यावर कायदा केला तरच यामध्ये बदल घडेल, असेही त्या म्हणाल्या.

(Edited by Sachin Waghmare)

Sharmila Thackrey
Sharmila Thackeray News : शर्मिला ठाकरेंच्या तळव्यावर रंगणार 'राज' रंग…

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com