Raj Thackeray On Nitin Desai Death : '' ही वेळ त्यांच्यावर कशामुळे आली...'' ; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मोठी मागणी

Nitin Desai Death : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक 'एक्झिट'मुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Raj Thackeray - Nitin Desai
Raj Thackeray - Nitin Desai Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखल ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक 'एक्झिट'मुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Raj Thackeray - Nitin Desai
Pradeep Kurulkar Case: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामिनासाठी अर्ज; ९ ऑगस्टला होणार सुनावणी

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले..?

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ज्येष्ठ कलादिग्दर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झाल्याचं म्हटलं आहे. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray - Nitin Desai
Pune ATS News: झुल्फिकार बडोदावालाकडून मिळत होती पुण्यातील दोन दहशतवाद्यांना आर्थिक रसद

''....ह्याचा छडा लागला पाहिजे !''

नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? असेही राज ठाकरे म्हणाले. नितीन देसाई(Nitin Desai) यांच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली असेही ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com