Mns News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा ९ एप्रिल रोजी मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कवर मैदानावर होणार आहे. मनसेच्या या पाडवा मेळाव्याला मुंबई पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवाजी पार्कवर राज गर्जना होणार असल्याने मनसे अध्यक्ष काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने रणशिंग फुंकले आहे. एकीकडे मनसे- भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत एकत्र यावेत, या उद्देशाने 9 एप्रिल 2016 ला मुंबईत पहिला पाडवा मेळावा आयोजित केला होता. या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी सुरू केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे वांद्रे येथील ताज लॅण्डसन हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मनसे- भाजप युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युतीबाबत लवकरच निर्णय होईल, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का याची उत्सुकता लागली आहे.
R