
Eknath Shinde News : सध्या देशभरातील प्रत्येक राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीला लागला आहे. नेतेमंडळी आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा आणि आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा प्रभाव विधानसभेवर पडेल हे उघड गुपित आहे. अशातच आता लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची नांदी असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केलं आहे. शिवाय कुठल्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. या अनुषंगाने आतापासूनच तयारी करा, अशा सूचनादेखील त्यांनी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) म्हणाले, "मी 45 वर्षे बाळासाहेब ठाकरे याच्यासोबत होताे. 11 वर्षे उद्धव ठाकरेंसोबत होतो, तर मागील एक वर्षापासून एकनाथ शिंदेसोबत काम करतोय. एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला. या उठावामुळे महाविकास आघाडीचं (MVA) सरकार पडलं आणि भाजपसोबत युती करत नवीन सरकार सत्तेत आणलं. या वेळी शिंदेनी कशाचीही पर्वा केली नाही. या उठावामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपेल याचा विचार न करता त्यांनी शिवसेना (Shivsena) बांधली. आता तुमच्या आयुष्यातील कसोटीचा काळ आलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे, निवडणुकीत कार्यकर्ता काय करू शकतो. हे दाखवण्याची वेळ आली आहे. सर्व आमदारांनी पदाधिकाऱ्यांना एकत्र आणलं पाहिजे, खासदारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेनेला (Shivsena) पुन्हा उभारी देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आमदार व खासदारांनी कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवावा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
तसेच लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पडली की, त्यानंतर लगेच विधानसभा (Assembly Election) आहेत. त्यामुळे आताची निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी या वेळी सांगितलं. तसेच या वेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, "कुठल्याही परिस्थितीत पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, या अनुषंगाने आतापासूनच तयारीला लागा." कीर्तिकर यांच्या विधानाने एकनाथ शिंदे (Eknath shinde) देखील मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा मीच या भूमिकेत असल्याचे संकेत दिले आहेत.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.