Shivsena VS BJP : शिंदे गटाची भाजपवर कुरघोडी; पालघरमधून गावितांची उमेदवारी फायनल?

Lok Sabha Election 2024 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बोईसरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. त्याचवेळी शिंदे गटाच्या युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Rajendra Gavit
Rajendra GavitSarkarnama

Palghar Political News : महायुतीतील पालघरच्या जागेचा तिढा अजून सुटला नसला तरी शिंदे शिवसेनेने विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच आपले उमेदवार असतील, असे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दुजोरा दिला आहे. ते पालघर येथील युवा सेनेच्या मेळाव्यात बोलत होते. महायुतीची पालघरमधून उमेदवारांची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. पालघरवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यापूर्वीच सेनेतर्फे गावितांचे नाव घेत भाजपवर दबावाचे तंत्रांचा वापर केल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची आज बोईसरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. त्याचवेळी शिंदे गटाच्या युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 2014 व 2019 मध्ये नागरिकांच्या भरघोस मतांनी निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित हे 2024 च्या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवारीसाठी नागरिकांच्या पाठबळाने सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

राजेंद्र गावित Rajendra Gavit यांनी सांगितले की, पालघरकरांनी माझ्यावर आतापर्यंत दाखवलेला विश्वास मी पुन्हा खरे करून दाखवेल तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी माझ्यावर केलेला आरोप खोटा असून या लोकसभेच्या निवडणुकीत पालघरकर बहुमताने आपल्याला जिंकून सिद्ध करून दाखवतील, असेही गावित म्हणाले. 2019 साली निवडून आल्यावर पालघर जिल्ह्यासाठी 200 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उपलब्ध करून दिले. यासाठी 210 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. तसेच जव्हार येथे दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी मान्यता मिळाली. त्यासाठी 95 कोटी निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Rajendra Gavit
Uddhav Thackeray News : भाजपने शिंदे सेनेला संपवले; उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

मागील पाच वर्षांत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला असून लिफ्ट, एस्केलेटर, वसई स्थानकाला जंक्शनचा दर्जा, पालघर स्थानकाचा अमृत भारत या योजनेत समावेश केला आहे. सामान्य माणसाने शिवसेनेसाठी केंद्रबिंदूप्रमाणे काम करावे तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी युवकांनी संघटन करण्याचा प्रयत्न करायला हवा तसेच शिवसेना शिंदे गट व युवा सेना वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक युवकांनी करण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, खासदार राजेंद्र गावित, राहुल लोंढे, शिवसेना उपनेते राजेश शहा, उपनेत्या ज्योती मेहेर, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य वैदेही वाढाण तसेच युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Rajendra Gavit
Solapur, Madha Lok Sabha : विजयदादा, धैर्यशील अन निंबाळकरांसाठी पहिल्याच दिवशी नेले अर्ज; सोलापूरमध्ये 58, तर माढ्यासाठी 64 अर्जांची विक्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com