Solapur, 12 April : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नावाने अर्ज नेण्यात आले आहेत. तसेच, भाजपच्या नावाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी, तर वंचितचे रमेश बारसकर यांनीही अर्ज नेला आहे. त्यामुळे माढ्यात पहिल्याच दिवशी 39 जणांकडून 64 अर्ज खरेदी करण्यात आले आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल झाला असून 38 इच्छुकांनी 58 अर्ज नेले आहेत. पहिल्याच दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी (Solapur lok sabha constituency) दीपक ऊर्फ श्री व्यंकटेश्वरा महास्वामी यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यांनी भाजपच्या नावाने अर्ज भरला आहे, तसेच, उमेदवारी अर्ज नेलेल्यांमध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारी यांचा समावेश आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी 38 इच्छुकांनी 58 अर्ज नेले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा लोकसभा मतदारसंघासाठी 39 जणांनी 64 अर्ज नेले आहेत. त्यात ॲड नितीन जयसिंगराव खराडे यांनी 4 अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षासाठी नावाने धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नावाने, तर गणेश सिध्देश्वर भिंगे यांनी 2 अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाने अर्ज नेले आहेत.
सतीश शिवाजी जंगम यांनी 4 अर्ज भारतीय जनता पार्टीसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावावर नेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे माढ्याचे उमेदवार रमेश नागनाथ बारसकर यांनी स्वतःसाठी 3 अर्ज नेले आहेत, त्यामुळे पहिल्याच दिवशी भाजप, राष्ट्रवादी आणि वंचितच्या उमेदवारांसाठी अर्ज नेण्यात आले आहेत.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हेही नशिब अजमवत आहेत. तसेच, एमआयएमचा उमेदवारही घोषित होणार आहे. त्यामुळे सोलापुरात चौरंगी लढत होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना, वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांना उमेदवारी घोषित झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यामुळे माढ्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.