MNS Raju Patil : ''...तर अधिकाऱ्यांना बिनधास्त ठोकून काढा'' ; राजू पाटील यांचा 'मनसे' कार्यकर्त्यांना केलं अ‍ॅक्टिव्ह!

MNS Kalyan Dombivli News 'लोकांना आजही मनसे पक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विश्वास' असंही राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलून दाखवलं.
Raju Patil
Raju Patil Sarkarnama
Published on
Updated on

Raju Patil in Kalyan Dombivli MNS Meeting : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानहानीकारक पराभव झाला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे एकमेव असलेले आमदार राजू पाटील हे जिंकून येतील असे प्रत्येक मनसैनिकाला वाटत होते. मात्र राजू पाटलांचाही या निवडणुकीत धक्कादायक असा पराभव झाला आणि हा पराभव प्रत्येक मनसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत 'मनसे'चा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ आली आहे. मात्र ही मरगळ झटकून कामाला लागा. आपण अजून आहोत. असं राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. तसेच, अधिकाऱ्यांकडून काम करून घ्या. काम होत नसतील, तुम्हाला कुठे अडचण वाटली तर बिनधास्त अधिकाऱ्यांना ठोकून काढा. खरतर खूप शेफारलेत, यांना वाटतंय आमचा आका आहे. पण तसे काही नाही आपण अजून आहोत अशा शब्दांत मनसेचे नेते राजू पाटील(Raju Patil) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे.

Raju Patil
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्यासाठी हीच आहे का योग्य वेळ?

कल्याण डोंबिवली मधील मनसेचे(MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीनंतर पूर्णतः शांत झाले. हा धक्का ते पचवू शकत नसल्याची चर्चा राजकिय गोटात सुरू होती. मात्र कल्याण येथे परप्रांतीयांनी मराठी माणसाला मारहाण केली आणि मनसे पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला.

येत्या वर्षभरात महापालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मनसेचे नेते राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा कामाला लागा, असे सांगितले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. चक्क मनसेचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की काम होत नसतील तर अधिकाऱ्यांना बिनधास्त ठोकून काढा.

Raju Patil
Uddhav Thackeray on Amit Shah: 'अमित शाह, जखमी वाघ काय असतो अन् त्याचा पंजा काय असतो, हे...' ; उद्धव ठाकरेंचा थेट निशाणा!

राजू पाटील नेमकं काय म्हणाले? -

राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ''लोकांना आजही मनसे पक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर विश्वास आहे. तुम्ही काम करत रहा, वेगवेगळे विषय हाती घ्या, पत्रव्यवहार करा, अधिकाऱ्यांना जाब विचारा आणि त्याच्याकडून कामे करून घ्या. अधिकाऱ्यांवर मारहाण केल्यानंतर कलम 353 दाखल होतो. हा गुन्हा आता शिथिल झाला आहे, आता जामीन होतो. तुम्हाला कुठे अडचण वाटली तर बिनधास्त ठोकून काढा, परंतु वचक तो अधिकाऱ्यांवर राहिला पाहिजे.''

तसेच ''खरतर खूप शेफारलेत, यांना वाटतंय आमचा आका आहे. आम्हाला वाचवेल किंवा आपण सांगितलेली काम करायची नाही ! असं त्यांचा आका त्यांना सांगत असतो. अस काही नाही, आपण अजून आहोत. अधिकाऱ्यांवर वचक ठेवा. जेव्हा वेळ पडली, तुम्हाला जेव्हा गरज आली नुसतेच मारत नका सुटू... परंतु नाही एकल चुकीचं असेल भ्रष्टाचार करत असेल सोडू नका त्याला, मी आहे तुमच्या सोबत. वचक नसेल तर हे आपल्याला भाव देणार नाहीत. कारण यांना सवय लागली आहे वरच्यांचा फोन आला ! काम नाही करायच. कस काम नाही कारणार पगार आपल्या पैशातून घेतात ते त्यामुळे या गोष्टी पुन्हा उतरवायला लागतील.'' असंही राजू पाटील यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com