
Shivsena UBT Melava News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत अंधेरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला. खुल्या मैदाना यानिमित्त झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांनी भाजपच्या मेळाव्या उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यांना आता उद्धव ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे म्हणाले, ''आजपर्यंत 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस आपण षणमूखानंद हॉलमध्ये करत होतो. पण दोन महिन्यांपूर्वी जो काही निवडणुकांचा निकाल लागला. मला तर काही पटलेला नाही. मध्यंतरी अब्दाली येवून गेले. कोण अमित शाह आणि त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे.''
''ठीक आहे, अमित शाह जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो. हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह काय आहे, किस झाड की पत्ती है? मी मुद्दाम आज ही सभा घेतली. म्हटलं कळू तरी द्या माझ्यासोबत आहेत तरी कोण? किती लोक राहिलेत?''
''अमित शाह तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही(जनता) माझी अस्सल शिवसेनाप्रमुखांनी दिलेली माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. जे शिवसेनाप्रमुख बोलायचे, की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेनाप्रमुख आहे. तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात, तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे.''
''गद्दाराने वार केलं तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी बसेन. पण ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला की उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडले आहेस, तू बाजूला हो. त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्रिपद सोडलं तसं मी प्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे, की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातील एक सदस्य मानतो, मला त्यांचा कुटुंब प्रमख मानतो. तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठूरपणे एवढा निर्दयपणे जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही.''
''हार जीत होत असते, पण मूळात हा विजय. जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता. तसा विजय देखील भाजपच्या अनेक लोकांना पचत नाही की, आपण जिंकलो कसे? काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे. EVMचा तर नक्कीच आहे. पण एक साधा प्रश्न आहे, की ज्या अमित शहांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादलं. ते सहजासहजा महाराष्ट्र आपल्या हातून सुटू देतील?''
एकतर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं, तो फटका, त्यांच्या वर्मी जो घाव बसलेला आहे त्यातून अजून ते उठत नाही. त्यांना पक्क माहिती आहे, की ज्या क्षणी दिल्ली आपल्या हातून जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेचा मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतली सरकार तुम्हाला कोलमडलेलं दिसलं असतं. ही महाराष्ट्राची ताकद आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.