Raju Shetti MHADA House : राजू शेट्टींना लागली लॉटरी; मुंबईत मिळालं हक्काचं घर!

Raju Shetti got house from MHADA lottery News : जाणून घ्या, राजू शेट्टींना मिळालेल्या घराची किंमत किती आहे आणि नेमकं कोणत्या भागात आहे घर?.
Raju Shetti and MHADA
Raju Shetti and MHADASarakarnama
Published on
Updated on

Raju Shetti Mumbai MHADA house : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना 'म्हाडा'ची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे मायनगरी संबोधल्या जाणाऱ्या मुंबईत राजू शेट्टी यांना खासदार कोट्यातून घर मिळाल्याने सर्वांच्च्या भूवया उंचवाल्या आहेत.

सर्वसामान्यांप्रमाणे आमदार-खासदारांसह लोकप्रतिनिधीही मुंबईतील घरासाठी इच्छुक असतात. त्यामुळेच म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत या लोकप्रतिनिधींसाठीही विशेष आरक्षित कोटा असतो. यंदा याच कोट्यातून राजू शेट्टींनी(Raju Shetti) आपल्या मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण केलं, असं दिसत आहे.

Raju Shetti and MHADA
Nana Patole : "शेतकऱ्यांप्रमाणे महायुती सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करत आहे" - नाना पटोले

म्हाडाकडून मागील महिन्यात २०३० घरांसाठी लॉटरीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानंतर यासाठी मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल झाले व आज या घरांसाठी सोडत निघाली. मुंबईतील घरांसाठी सर्वसामान्यांप्रमाणे नेते मंडळी आणि कलाकारांकडून अर्ज आल्याचे दिसून आले. या सोडतीसाठी तब्बल १ लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी केवळ २०३० जणांनाच घर मिळालं. तर राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे(Atul save) यांनी लवकरच आणखी एक लॉटरी आणणार असल्याचं सांगितलं आहे.

Raju Shetti and MHADA
Ajit Pawar : मोठी बातमी! बारामतीत अजित पवारांचा ताफा अडवला; 'हे' आहे कारण

राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यामधून घरासाठी अर्ज केला होता आणि या कोट्यातून त्यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांना घर मिळणार हे आधीच निश्चित झालं होतं. पवईमधील कोपरी पवई या भागात राजू शेट्टी यांना घर मिळालं असून, त्याची किंमत १ कोटी २० लाख ३२३ रुपये इतकी आहे. तर त्यांनी खासदार कोट्यातून मध्यम श्रेणीतील घरासाठी अर्ज केला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com