Ajit Pawar : मोठी बातमी! बारामतीत अजित पवारांचा ताफा अडवला; 'हे' आहे कारण

NCP Political News : अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात आपल्याला विधानसभा निवडणूक लढण्यात रस राहिला नसल्याचं सांगतानाच,बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन केलं होतं.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : अजित पवार यांनी आत्तापर्यंत तब्बल सातवेळा बारामती विधानसभा नव्या विक्रमांनी जिंकली आहे. मात्र,राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अशातच त्यांनी नवा मतदारसंघ शोधल्याचेही बोलले जात आहे. पण आता अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतून लढणार नसल्याच्या चर्चांमुळे त्यांचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.या कार्यकर्त्यांनी बारामतीत अजितदादांचा ताफाच अडवला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज बारामतीमध्ये (Baramati) आले असता बारामती मतदारसंघातील सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत मोठी गर्दी केली होती.तसेच अजितदादा आपणच बारामतीमध्ये विधानसभेसाठी उभे राहावे अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. अजित दादांनीही ताफा थांबवत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी अजित पवारांच्या कट्टर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात आपल्याला विधानसभा निवडणूक लढण्यात रस राहिला नसल्याचं सांगतानाच,बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन केलं होतं. तसेच ते शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता अजितदादांचे कार्यकर्ते मात्र त्यांना बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवावी म्हणून आग्रही आणि तितकेच आक्रमक झाले आहेत.

बारामती नाही तर अजित पवार कुठून उभे राहणार असा प्रश्न चर्चेत असतानाच आता एका मतदारसंघाचं नाव समोर येत आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : हरियाणातील दणदणीत विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' नोव्हेंबर महिन्यांत महाराष्ट्रातही..'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल पटेल म्हणाले, मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की, अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील.मी पहिली जागा जाहीर करतो, असं पटेल यांनी ठणकावून सांगितले.

याचवेळी त्यांनी रामराजे निंबाळकर यांच्या भागात स्थानिक विषय आहेत.आम्ही त्यांच्याशी बोलणार आहेत. निवडणुकीच्या काळात काही हालचाली होत असतात.आमच्याकडे देखील लोक येणार आहेत असंही पटेल म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar : 'विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, आम्ही सत्तेत आल्यास पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना सुरू राहील'

बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाल्यास अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याआधीच अजित पवार यांचा डीएनए बारामतीचा असल्याने ते बारामतीतूनच निवडणूक लढवतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com