मुंबई : पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पण सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू असून सर्व पक्षांमध्ये इच्छूकही वाढले आहेत. एकूण सहा जागांपैकी एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये इच्छूकांची यादी वाढतच चालल्याने डोकेदुखी वाढली आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)
राज्यसभेत 2016 मध्ये माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे महाराष्ट्रातून राज्यसभेत गेले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांना पुन्हा महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाणार नाही, अशी शक्यता आहे. त्याऐवजी त्यांना तमिळनाडूतून संधी दिली जाऊ शकते. (Congress Latest Marathi News)
महाराष्ट्रातील एका जागेसाठी राज्यातील काँग्रसे नेत्यांसह केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्याही नावांची जोरदार चर्चा आहे. मुंबईतून माजी खासदार मिलिंद देवरा व संजय निरुपम इच्छुक आहेत. तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे.
आजपासून राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. पण काँग्रेसमधील नावांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यासाठी आता दिल्लीत खलबतं सुरू झाली आहे. पुढील एक-दोन दिवसांत बैठकांचं सत्र सुरू राहील. त्यानंतरच शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.
विधान परिषदेत दोन जागा?
राज्यसभेसह विधान परिषदेच्या दहा जागांसाठीही निवडणूक होणार आहे. सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास भाजपला चार तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसची एक जागा सहजपणे निवडून येऊ शकते. काँग्रेसची जवळपास 15 मते उरतात. त्यामुळे काँग्रेसला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी 10 ते 12 मतांची तजवीज करावी लागणार आहे. आकड्यांची जुळवाजुळव झाल्यास काँग्रेसच्या विधान परिषदेतील दोन जागा वाढतील. त्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.