राज्यसभेच्या महाराष्ट्रात दोन जागा रिक्त आहेत. तीन सप्टेंबरला होत असलेल्या राज्यसभेची (Rajya Sabha Election)निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकांचा सपाटा सुरु आहे. एक जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे. एका जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे.प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काल रात्री बैठक घेण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal), बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे (Anand Paranjape), नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे./यात साताऱ्याचे नितीन पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असून वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ आहेत. उद्या (बुधवार) राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
२०१९ मध्ये सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (श्रीनिवास पाटील) जिंकली होती. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह अजित पवार गटाने महायुतीकडे धरला होता. मात्र, भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली.
‘आम्ही लोकसभेची सातारची जागा भाजपला सोडली. त्या बदल्यात राज्यसभेची उदयनराजेंची जागा भविष्यात रिक्त झाल्यास ती आम्हाला देण्याचा शब्द भाजपने दिला’ असे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
वाईच्या सभेत अजित पवारांनी जोरदार भाषण करताना वाईतून उदयनराजेंना एक लाखांचे मताधिक्य द्या, नितीन पाटलांना निकालानंतर राज्यसभेवर घेऊन खासदार करतो, असा शब्द दिला होता. त्यामुळे अजित पवार हे नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास नितीन पाटील यांच्या समर्थकांना आहे. हा विश्वास अजितदादा सार्थ ठरविणार का? हे उद्या समजेल.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. विधानसभा सदस्यांमधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते. आता या 2 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील एक जागा भाजपकडे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.