Pune Porsche Car Accident Case: पुणे पॉर्श अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक

Pune POlice Porsche Car Accident Case two arrested:ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणी दोघांवर आरोप आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी दोघांची नावे आहेत.
Pune Porsche Car Accident:
Pune Porsche Car Accident:Sarkarnama
Published on
Updated on

Pune: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणी या दोघांवर आरोप आहे. आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी त्यांची नावे आहेत.

आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी त्या मुलांचे वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल यांच्यासह ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. आरोपी आणि सरकारी पक्षांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादानंतर त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.

सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहे. पोर्शे अपघात प्रकरणाच्या तपासात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात रोज नवीन खुलासे, माहिती समोर येत आहे, मुख्य वैद्यकीय अअधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती दोषारोप नमूद केली आहे.

Pune Porsche Car Accident:
RPI Ramdas Athawale On Mahayuti : महायुती खबरदार, सन्मानानं घ्या, नाहीतर परिणाम भोगा; रिपाई आठवले गटाचा इशारा

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर त्या रात्री पार्टी करणाऱ्या 15 मुलांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. त्यामधून तपासाच्या दृष्टीने काही धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मे महिन्यात कल्याणीनगर भागात पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये दुचाकी वरून जात असलेल्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एका तरुण तरुणीचा समावेश होता. ज्या कारने हा अपघात झाला ती कार एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित होता. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांचा हा मुलगा आहे.

अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करणारे या मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, तसेच ससूनमधील काही डॉक्टरांसह पबमध्ये या मुलांना मद्य विक्री करणारे पबमालक, पब मॅनेजर अशा 10 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com