देशमुखांच्या स्वागतासाठी रॅली; राष्ट्रवादी युवक अध्यक्षांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

तब्बल १३ महिन्यानंतर कारागृहाबाहेर आलेल्या देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आर्थर रोड कारागृह ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढण्यात आली होती.
Anil Deshmukh Well Come Rally
Anil Deshmukh Well Come RallySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रॅली प्रकरणी मुंबई (Mumbai) पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षांसाह तब्बल १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली होती. (Rally to welcome Anil Deshmukh; case filed against 100 people including NCP Youth President)

कथित शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत असलेले माजी गृहमंत्री देशमुख यांची बुधवारी कारागृहातून सुटका झाली. तब्बल १३ महिन्यानंतर कारागृहाबाहेर आलेल्या देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आर्थर रोड कारागृह ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढण्यात आली होती.

Anil Deshmukh Well Come Rally
Sushilkumar Shinde : निवडणूक न लढविण्याची घोषणा करणारे शिंदे म्हणतात ‘मी अजून म्हातारा झालो नाही..’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नीलेश भोसले यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली हेाती. मात्र, पोलिसांनी सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण केल्याने भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anil Deshmukh Well Come Rally
Ajit Pawar On Bawankule: "करेक्ट कार्यक्रम करू," असं बावनकुळे म्हटल्यापासून मला झोप येत नाही ; अजित पवारांचा टोमणा

देशमुख हे १३ महिन्यांनी जामीनावर बाहेर आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेतेही देशमुखांच्या स्वागताला हजर होते. मात्र, अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला परवानगी ही पोलिसांकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी १४३, भादंवि १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम, भादंवि कायद्याअंतर्गत या प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, तब्बल १३ महिन्यांनंतर आर्थर रोड कारागृहातून जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे बडे नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com