Thane Politics : लाडवांची होणार साखरेशी टक्कर; सरनाईकांकडून 51 हजार किलो साखर तर संजीव नाईकांकडून 25 टन लाडूंचे वाटप

MLA Pratap Sarnaik and Former MP Sanjeev Naik: अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सध्या ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
MLA Pratap Sarnaik and Former MP Sanjeev Naik
MLA Pratap Sarnaik and Former MP Sanjeev NaikSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर :

Thane News: ठाणे लोकसभेच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने अशा महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी दावेदारी केली आहे. त्यातच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील इच्छुकांच्या नावांमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरून अक्षरशः चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.

आमदार प्रताप सरनाईकांनी 51 हजार किलो साखर वाटप करण्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संजीव नाईक यांनी तब्बल 25 टन लाडू भाजप मंडळामार्फत घरोघरी नागरिकांना पाठवले आहेत. त्यामुळे लाडूंची आता साखरेशी टक्कर झाल्याची परिस्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Pratap Sarnaik and Former MP Sanjeev Naik
Ravindra Chavan : भाजपला पुन्हा अटलजींची आठवण, जोडले डोंबिवली कनेक्शन

अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवरच ठाणे जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे.

राम कथा, रामायण महोत्सव असो या महाआरती किंवा रामरथ तसेच जन्मोत्सव असो, या दीपोत्सव अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. याच दरम्यान काही नवीन संकल्पना पुढे येऊ लागल्या आहेत. यामध्ये ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 51 हजार किलो साखर वाटपाचा संकल्प केला आहे. ही साखर ते निवडून आलेल्या मतदारसंघात प्रत्येकाला 1 किलोच्या स्वरूपात वाटप करणार आहेत. तर सरनाईक हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून त्यांचेही नाव लोकसभेच्या इच्छुकांमध्ये घेतले जात आहे.

यातच भाजपचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असून त्यांनी त्यादृष्टीने तयार ही सुरू केलेली आहे. तर, त्यांच्या माध्यमातून वर्तकनगर साईबाबा मंदिरात 25 टन लाडू तयार करण्यात आले आहेत. शनिवारपासून त्यांच्या लाडू वाटपाला सुरू झाली असून भाजप मंडळामार्फत घरोघरी नवीमुंबई, ठाणे आणि मीरा- भाईंदर या शहरातील घराघरात वाटप केले जात आहेत. तर त्यांनी घरोघरी 'अक्षदा'चेही वाटप केले आहे.

या अक्षदा वाटपात स्वतः नाईक हे घरोघरी फिरले आहेत. याशिवाय भाजपकडून चर्चेत नाव असलेले दुसरे नाव विनय सहस्त्रबुद्धे हे देखील माजी खासदार असून त्यांच्यामार्फत गावदेवी मैदान येथे रामायण महोत्सव आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावल्याने ती त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे रामायम महोत्सव की लाडूंची साखरेशी टक्कर होते ? हेच येत्या काळात पाहावे लागणार आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

MLA Pratap Sarnaik and Former MP Sanjeev Naik
Devendra Fadnavis: ठाकरे गटाला फडणवीसांनी पुरावाच दिला; फोटो शेअर करीत म्हणाले "बाबरी मशिद पडली तेव्हा मी तिथेच..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com